Home /News /technology /

Google चे हे टॉप 5 सिक्रेट्स माहितेय का? असा करता येईल भन्नाट फीचर्सचा वापर

Google चे हे टॉप 5 सिक्रेट्स माहितेय का? असा करता येईल भन्नाट फीचर्सचा वापर

या सर्च इंजिनमध्ये अनेक गोष्टी आहेत, ज्याबाबत कित्येकांना माहिती नाही. गुगलच्या अशा काही 5 ट्रिक्स आहेत ज्या तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतील.

  नवी दिल्ली, 2 मे : Google जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे. या सर्च इंजिनमध्ये अनेक गोष्टी आहेत, ज्याबाबत कित्येकांना माहिती नाही. गुगलच्या अशा काही 5 ट्रिक्स आहेत ज्या तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतील. Google वापरण्यासाठी इंटरनेटची गरज असते. पण कधी इंटरनेट नसला तरी गुगलवर टाइमपास करता येतो, वेळ घालवता येतो. इंटरनेट नसल्यास गुगलवर ऑफलाइन डायनासॉर गेम येतो. ज्यावेळी इंटरनेट नसतं, त्यावेळी हा गेम आपोआप पेजवर येतो, त्यावर क्लिक करुन युजर हा गेम खेळू शकतात. गुगलवर पेज टिल्टही करता येतं. गुगलची ही ट्रिक अनेकांना माहित नाही. सर्च बारमध्ये Askew टाइप करा. त्यानंतर एंटर केल्यानंतर पेज एकाबाजून टिल्ट होईल. यामुळे स्क्रिनमध्ये कोणतीही समस्या येणार नाही. टेक्स्ट काहीसा खालच्या बाजूला झुकलेला दिसेल. नव्या पेजवर गेल्यावर तो पुन्हा आधीप्रमाणे दिसेल. एका ट्रिकने गुगलचं होमपेज गोल फिरतं. गुगल ऑर्बिट टाइम करा आणि सर्चवर क्लिक करा. सर्वात आधी समोर गुगल स्फीयर मिस्टर डूब असं दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर होमपेज फिरणं सुरू होईल.

  हे वाचा - गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल हटवण्यासाठी करता येणार रिक्वेस्ट; Google ची मोठी घोषणा

  जर तुमच्याकडे शिक्का नसेल आणि खेळण्यासाठी टॉसची गरज आहे, तर गुगल तुमची मदत करेल. फ्लिप अ कॉइन टाइप करा आणि एंटरवर क्लिक करा. हेड्स किंवा टेल्सपैकी एकावर क्लिक करा. हे टॉसप्रमाणेच तुमची मदत करेल. ज्यावेळी बोर्ड गेम खेळायचा असतो, त्यावेळी डाइस फिरवावा लागतो. जर तुमच्याकडे डाइस नसेल तर Google डाइसदेखील रोल करण्याचा पर्याय देतो. त्यासाठी Roll A Dice टाइप करा. त्यानंतर एक व्हर्चुअल डाइस मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news

  पुढील बातम्या