Home /News /technology /

Google Smartwatch खरेदी करण्याचा विचार करत आहात? हात जळल्याची युजरची तक्रार

Google Smartwatch खरेदी करण्याचा विचार करत आहात? हात जळल्याची युजरची तक्रार

फिटबीट वियरेबल मेकरच्या संपूर्ण प्रोडक्ट लाइनमध्ये युजर्सला अधिक गरम आणि हात जळण्याचा त्रास होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  नवी दिल्ली, 8 मे : Google च्या Fitbit ला एका न्यायालयीन प्रकरणाचा सामना करावा लागला आहे. या फिटबीट वियरेबल मेकरच्या संपूर्ण प्रोडक्ट लाइनमध्ये युजर्सला अधिक गरम आणि हात जळण्याचा त्रास होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण मागील अनेक दिवसांपासून असून आता याबाबत माहिती समोर आली आहे. ओव्हरहिटींग - मार्चमध्ये Google ने 1.7 मिलियन Fitbit Iconic यूनिट्स परत मागवले होते. याचं कारण ओव्हरहिटींग होतं. स्मार्टवॉचच्या रिपोर्टमध्ये ओव्हरहिटींगमुळे (Smartwatch Overhitting) अनेकांना जळल्याचा त्रास झाल्याने जखम झाल्याच्या समस्या आल्या होत्या. फिटबीटविरोधात तक्रारीत ग्राहक कॅलरी जाळण्यासाठी उत्पादन खरेदी करतात, त्यांची त्वचा नाही असं सांगण्यात आलं होतं. कॅलिफोर्नियातील दोन पुरुषांनी Fitbit आणि Google वर दावा केला, की ओव्हरहिटींगची समस्या केवळ स्मार्टवॉचपुरती मर्यादित नाही. एक व्यक्ती Fitbit Versa Lite वापरत होती, तर दुसरी Fitbit Versa 2 वापरत होती. खटल्यात दावा करण्यात आला आहे, की इतर फिटबीट उत्पादनांमध्ये समान समस्या आहेत आणि या त्रुटी असणाऱ्या सीरीजमध्ये वर्सा, वर्सा 2, वर्सा 3, चार्ज 4, वर्सा लाइट, आयनिक, सेंस, अल्टा एचआर, इंस्पायर, इंस्पायर एचआर, इंस्पायर 2 आणि ब्लेज सामिल आहे.

  हे वाचा - तुम्हीही Online Fraud चे बळी ठरला आहात का? चिंता नको; अशी करा रीतसर Complaint

  तक्रारीनंतरही परिस्थिती जैसे थे - Fitbit ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी कंपनी मदत करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने ग्राहकांनाच दोष दिल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीने सादर केलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये Fitbit च्या खासगी आणि सार्वजनिक चॅटचे स्क्रिनशॉट सामिल आहेत. Fitbit ने ग्राहकांना पूर्ण पैसे परत करण्याचं सांगितलं असलं तरी नुकसानभरपाई देण्याबाबत कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही असंही सांगण्यात आलं आहे. Fitbit च्या उत्पादन लाइनमध्ये ओव्हरहिटींगची समस्या असल्यास Google आणि Fitbit यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या