मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google बंद करणार तुमच्या कामाचं हे पॉप्युलर App, पाहा कधीपासून करता येणार नाही वापर

Google बंद करणार तुमच्या कामाचं हे पॉप्युलर App, पाहा कधीपासून करता येणार नाही वापर

Android Auto For Phone Screen फीचर या वर्षाच्या अखेरपर्यंत अँड्रॉईड डिव्हाईसवर काम करणार नाही. त्याऐवजी ‘Google Assistant Driving Mode’ वापरण्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : टेक कंपनी गुगलने (Google) अँड्रॉईड 12 (Android 12) सह ‘Android Auto for Phone Screens’ बंद केलं आहे. वर्जने दिलेल्या रिपोर्टनुसार, ज्या युजर्सला आपल्या अँड्रॉईड फोनसाठी (Android Phone) एक फ्रेंडली ड्रायव्हिंग इंटरफेस हवा आहे, त्यांना आता ड्रायव्हिंग मोडसाठी गुगल असिस्टेंटचा (Google Assistant) वापर करावा. गुगल असिस्टेंट गुगल मॅप्स किंवा कारमध्ये नेटिव्ह अँड्रॉईड ऑटो इंटरफेस रुपात आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, जे युजर्स ऑन फोन एक्सपिरिअन्स (Android Auto मोबाईल अ‍ॅप) चा वापर करतात, त्यांचं गुगल असिस्टेंट ड्रायव्हिंग मोडमध्ये ट्रांसिशन होईल. अँड्रॉईड 12 मध्ये Google असिस्टेंट ड्रायव्हिंग मोड बिल्ड-इन मोबाईल ड्रायव्हिंग एक्सपिरिअन्स रुपात येईल. सध्या याबाबत कोणतेही डिटेल्स देण्यात आलेले नाहीत.

4.1कोटी WhatsApp मेसेज,38 लाख Google Search..;1 मिनिटांत इंटरनेटवर काय-काय होतं?

कंपनीने 9to5Google ला दिलेल्या माहितीनुसार, Android Auto For Phone Screen फीचर या वर्षाच्या अखेरपर्यंत अँड्रॉईड डिव्हाईसवर काम करणार नाही. काही युजर्सला गुगलचं हे अ‍ॅप बंद होण्याची हिंट मिळाली आहे. Android Auto केवळ कार स्क्रिनसाठी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं असून, त्याऐवजी ‘Google Assistant Driving Mode’ वापरण्याचं सांगण्यात आलं आहे.

Fraud Alert: एका चुकीमुळे इंजिनिअरला हजारोंचा फटका! त्याने केलेली चूक तुम्ही अजिबात करू नका

Google ने Android Auto App 2019 मध्ये लाँच केलं होतं. हे अ‍ॅप आतापर्यंत जवळपास 50 लाख वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे, याचा खुलासा गुगल प्ले स्टोरच्या (Google Play Store) लिस्टिंगमधून करण्यात आला आहे. कारमध्ये Android Auto बिल्ड-इन सपोर्ट रुपात मिळतं.
First published:

Tags: Android, Google, Tech news

पुढील बातम्या