मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google ची नवी प्रायव्हसी पॉलिसी, तुमच्यावर असा होणार परिणाम

Google ची नवी प्रायव्हसी पॉलिसी, तुमच्यावर असा होणार परिणाम

येणाऱ्या काही दिवसांत एक नवी प्रायव्हसी पॉलिसी आणली जाईल, यात 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्स किंवा त्यांचे पालक टीनएजर्सचा फोटो गुगल सर्च रिजल्टमधून हटवण्याची रिक्वेस्ट करू शकतात.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : गुगल (Google) आपली प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy)  अपडेट करत आहे. या पॉलिसीअंतर्गत 18 वर्षाखालील वयोगटातील युजर्सचे फोटो हटवले जाऊ शकतात. यासाठी मुलं किंवा त्यांचे पालक रिक्वेस्ट करू शकतात. यामुळे Google Image सर्च रिजल्टमधून त्यांचा फोटो हटवला जाऊ शकतो.

18 वर्षाखालील युजर्सची लोकेशन हिस्ट्रीही ऑफ राहिल. लोकेशन हिस्ट्री ऑन करण्याचा पर्याय दिला जाणार नाही. Google आता 13 वर्ष मुलांचं अकाउंट बनवण्याची परवानगी देत नाही. वृत्तसंस्था PTI च्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या काही दिवसांत एक नवी प्रायव्हसी पॉलिसी आणली जाईल, यात 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्स किंवा त्यांचे पालक टीनएजर्सचा फोटो गुगल सर्च रिजल्टमधून हटवण्याची रिक्वेस्ट करू शकतात.

पालकांना दिलासा; आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही

गुगलचे प्लॅटफॉर्म युट्यूब, सर्च, असिस्टेंट आणि इतर काही प्रोडक्टसाठीही अनेक बदल करणार आहे. युट्यूबसाठी कंपनी 13 ते 17 वर्षांच्या युजर्ससाठी अपलोड सेटिंग प्रायव्हेट ठेवली जाईल.

Google Chrome चा वापर करता का? लगेच करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी

तसंच, Google नवं Digital Wellbeing फिल्टर जारी करेल. यात युजरला न्यूज, पॉडकास्ट, वेबपेजचा अॅक्सेस असिस्टेंट एनेबल स्मार्ट डिव्हाईसवर ब्लॉक करण्याची परवानगी दिली जाईल. युट्यूबवर 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्ससाठी टेक अ ब्रेक आणि बेडटाईम रिमाइंडर आणि ऑटोप्ले टर्न ऑफ करण्याचा ऑप्शन मिळेल.

दरम्यान, गुगल (Google) येणाऱ्या काही महिन्यात 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्ससाठी अनेक बदल करणार आहे. कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

First published:

Tags: Google, Tech news