स्मार्टफोनचं व्यसन सोडवणार गुगलचा 'पेपर फोन', पाहा VIDEO

स्मार्टफोनचं व्यसन सोडवणार गुगलचा 'पेपर फोन', पाहा VIDEO

स्मार्टफोन दिवसभरातील अनेक कामं सोपी करत असला तरी त्याचा अतिवापर धोकादायक आहे. त्याचे व्यसन सोडवण्यासाठी गुगलने 'पेपर फोन' लाँच केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनचा वापर जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. याचे दुष्परिणाम माहिती असूनसुद्दा जास्त वापर केला जात आहे. मोबाइलमध्ये असलेल्या गेम्सने मानसिक आजार होत आहेत. शरिरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. आता ही स्मार्टफोनची सवय सोडवण्यासाठी गुगलने एक अनोखा फोन बाजारात आणला आहे. याला पेपर फोन असं म्हटलं जात आहे. या फोनला लंडनमधील स्पेशल प्रोजेक्ट्स स्टुडिओने तयार केलं आहे.

पेपर फोन लाँच करण्यामागे एकच कारण आहे की लोकांनी स्मार्टफोन थोडा बाजूला ठेवावा. ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्याची प्रिंट घेऊन पर्सनल बुकलेट तयार करावी. हा पेपरफोन तुम्हाला कॉल करण्यासाठी वापरता येणार नाही. पेपर फोनला अँड्रॉइड युजर्स गुगल प्लेवरून डाऊनलोड करू शकतात.

कॉन्टॅक्ट, मॅप, मीटिंग, टास्क लिस्ट किंवा हवामानाची माहिती या अॅपमधून निवडता येते. त्यानंतर ती माहिती एका पेपरवर बसवली जाते. त्याची प्रिंट काढता येते. स्पेशल प्रोजेक्ट्स स्टुडिओने म्हटलं आहे की, आम्हाला आशा आहे की, या लहानशा प्रयोगामुळे थोडावेळ का होईना टेक्नॉलॉजीपासून सुटका होईल. यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष देता येईल.

पेपर प्रिंटिगंमुळे पर्यावरणावर परिणाम होईल असं वाटत असेल तर त्याचा इतका परिणाम होणार नाही जितका मोबाईलच्या वापराने होतो. एका दिवसात एक पेपर प्रिंट केल्यास एका वर्षांत 10 ग्रॅम कार्बन तयार होतो. तर एका दिवसात फक्त एक तास फोन वापरला तरी वर्षभरात 1.25 टन इतका कार्बन डायऑक्साइड तयार होतो असं कंपनीने म्हटलं आहे.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Google
First Published: Oct 30, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading