Home /News /technology /

Android युजर्ससाठी अलर्ट; तुमच्या फोनमध्ये Apps सोबत व्हायरस तर डाउनलोड होत नाही ना?

Android युजर्ससाठी अलर्ट; तुमच्या फोनमध्ये Apps सोबत व्हायरस तर डाउनलोड होत नाही ना?

गूगल प्ले स्टोरवर 67.2 व्हायरस वाढवणारे ऍप अँड्ऱॉईड फोनमध्ये डाऊनलोड होतात. यावरील संशोधनासाठी 12 मिलियन अँड्ऱॉईड स्मार्टफोनमधून 7.9 मिलियन ऍप्सचा डेटा रेकॉर्ड करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : स्मार्टफोनमध्ये अँड्ऱॉईड (Android) सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरला जाणारा ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) आहे. यात इतर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमच्या तुलनेत सर्वाधिक ऍप डाऊनलोड करण्याची सुविधा असते. एका अभ्यासानुसार, गूगल प्ले स्टोर (Google Play Store) या ऑपरेटिंग सिस्टमसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. NortonLifeLock and IMDEA software institute in Madrid संशोधकांनुसार, गूगल प्ले (google play) अँड्ऱॉईड डिव्हाईसवर मालवेअर व्हायरसचा सर्वात मोठा वितरक असल्याचं म्हटलं आहे. संशोधनात असं सांगण्यात आलं की, 10 ते 24 टक्के अँड्ऱॉईड यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये गूगल स्टोरमधून नको असलेले ऍपही डाऊनलोड होतात. प्ले स्टोरवर 50 टक्क्यांहून अधिक व्हायरस ऍप - सिमेंटिक स्कोलर वेबसाईटनुसार, गूगल प्ले स्टोरवर 67.2 व्हायरस वाढवणारे ऍप अँड्ऱॉईड फोनमध्ये डाऊनलोड होतात. यावरील संशोधनासाठी 12 मिलियन अँड्ऱॉईड स्मार्टफोनमधून 7.9 मिलियन ऍप्सचा डेटा रेकॉर्ड करण्यात आला आहे. थर्ड पार्टी ऍप स्टोर्समध्ये केवळ 10.4 टक्के व्हायरस निर्माण करणारे ऍप इन्स्टॉल होतात. (वाचा - 10 पैकी 7 शहरी भारतीय खेळतात मोबाईल गेम्स;टॉप 10 गेमिंग देशांत भारताचा समावेश) 67.5 टक्के व्हायरस गूगल प्ले स्टोरमधून येतो - प्ले स्टोरच्या डाऊनलोड प्रक्रियेची इतर सात स्टोरशी तुलना केली गेली आहे. ज्यात वेब ब्राऊजर, कमर्शियल पे वर इन्स्टॉल प्रोगाम्स आणि इन्स्टंट मेसेज सामिल आहेत. अँड्रॉईडमध्ये एकूण ऍप डाऊनलोडचे 87.2 टक्के गूगल प्ले स्टोरमधून येतात. त्यामुळेच 67.5 टक्के व्हायरस गूगल प्ले स्टोरमधून येतो. मात्र, गूगल प्ले स्टोरचा वेक्टर डिटेक्शन रेशियो (VDR) इतर स्त्रोतांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. प्ले स्टोरचा व्हीडीआर केवळ 5.6 टक्के आहे, त्यामुळे प्ले स्टोर इतर नको असलेल्या ऍप्सच्याविरोधात सुरक्षा करण्यात सक्षम आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Google, Smart phone

    पुढील बातम्या