• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • भारतात रियल मनी गॅम्बलिंगची परवानगी देणार Google Play; जाणून घ्या काय आहे प्रकरण

भारतात रियल मनी गॅम्बलिंगची परवानगी देणार Google Play; जाणून घ्या काय आहे प्रकरण

गुगलने 2021 मध्ये आपली पहिली पॉलिसी अपडेट जारी केली आहे. आता कंपनी आपल्या प्ले स्टोअरवर रियल मनी गॅम्बलिंगवाल्या Apps ला मंजुरी देणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 जानेवारी : गुगल प्ले (Google Play) भारतात खास फीचर्स घेऊन येत आहे, जेणेकरून युजर्सला लॉयल कस्टमर्स बनवलं जाईल. डेव्हलपर्स यासाठी मिनि गेम्स (Mini Games), क्विज (Quiz) आणि इतर फीचर्सचा वापर करत आहे. गुगलने 2021 मध्ये आपली पहिली पॉलिसी अपडेट जारी केली आहे. आता कंपनी आपल्या प्ले स्टोअरवर रियल मनी गॅम्बलिंगवाल्या Apps ला मंजुरी देणार आहे. गेल्या वर्षात याच कारणामुळे गुगल प्ले स्टोअरवरून पेटीएमला हटवण्यात आलं होतं. गुगलच्या अधिकृत ब्लॉगनुसार, कंपनीने Gamified Loyalty programs साठी आपली पॉलिसी अपडेट केली आहे. यात कंपनी, गेममध्ये सामिल होणाऱ्या युजर्सला प्राईज मनीदेखील देणार आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक याकडे जोडले जातील. Google कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्या पॉलिसीला युजर्सची सुरक्षा आणि डेव्हलपर एक्सपीरिएस चांगला करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे. म्हणजेच नव्या पॉलिसीअंतर्गत गुगलने आपल्या युजर्ससाठी गेसिंग गेम, स्पिन द व्हीलसाररखे आकर्षक फीचर्स आणले आहेत.

  (वाचा - WhatsApp वर व्हायरल होतोय धोकादायक Worm Malware; फोन हॅक होण्याची शक्यता)

  भारतात Google Play Store वर रियल मनी गॅम्बलिंगसारख्या Apps ला परवानगी नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने याच कारणामुळे Paytm App ला प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं होतं. कंपनीने Paytm वर गॅम्बलिंग संबंधित धोरणांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. गुगलने Paytm First Games मुळे कंपनीला प्ले स्टोरवरून हटवलं होतं. परंतु काही तासांमध्ये पेटीएम प्ले स्टोअरवर पुन्हा आलं. दरवर्षी Play Store वरून जवळपास 20 बिलियन App आणि Game डाउनलोड होत असल्याचा दावा गुगलने केला आहे.
  Published by:Karishma
  First published: