Home /News /technology /

Google च्या Pixel 5 चा VIDEO चुकून झाला लीक; 30 सप्टेंबरला लाँच होणाऱ्या फोनची फीचर्स आणि किंमत काय असेल?

Google च्या Pixel 5 चा VIDEO चुकून झाला लीक; 30 सप्टेंबरला लाँच होणाऱ्या फोनची फीचर्स आणि किंमत काय असेल?

2020 मधील गुगलचा हा पहिलाच 5G स्मार्टफोन असणार आहे. लाँचिंगचं टीजर Google कडूनच लीक झालं आणि त्यावरूनच आता या फोनच्या फीचरचा अंदाज आला आहे.

    मुंबई, 28 सप्टेंबर: मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला Google Pixel 5 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. लवकरच याची अधिकृत फीचर्स, किंमत अशी माहिती जाहीर होईल. कंपनी या फोनच्या तयारीतच मग्न असताना अनवधानाने Google च्या जपानी Twitter हँडलवर एक VIDEO पब्लिश झाला. या लीक झालेल्या VIDEO मधून नव्या अँड्रॉइड फोनची बरीच माहिती मोबाईल प्रेमींना मिळाली आहे. Google आपल्या नव्या अँड्रॉइड स्मार्ट फोनची घोषणा 30 सप्टेंबरला करणार आहे. याच दिवशी Pixel5  फोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने याचसाठी तयार केलेलं टीजर चुकून ट्विटरवर प्रसिद्ध झालं आणि त्यावर मोबाईल प्रेमींच्या उड्या पडल्या. Google ने हा VIDEO असलेलं Tweet आता डिलीट केलं आहे. पण त्या लीक झालेल्या व्हिडीओमधून फोनविषयी बराच अंदाज आलेला आहे. भारतात या फोनची किंमत काय असेल आणि काय आहेत या फोनची वैशिष्ट्यं... जाणून घेऊ या.. Google Pixel 5 मध्ये ग्राहकांना 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर OLED डिस्प्ले मिळणार आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सरदेखील मिळणार आहे. त्याचबरोबर SD765G SOC प्रोसेसर देखील या फोनमध्ये मिळेल. चार्जिंगच्या सुविधेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. नुकतंच Google ने आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 4a लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची क्षमता या फोनमध्ये आहे. 26,300 रुपये या फोनची किंमत आहे. 4G आणि 5G अशा दोन प्रकारांत हा फोन लाँच करण्यात आला असून 5G व्हेरियंटची किंमत 37,000 रुपये आहे. फोनची किंमत अमेरिकेमध्ये Google Pixel 5 या फोनची किंमत 699 डॉलर म्हणजेच जवळपास 51 हजार रुपये असणार आहे. Google Pixel 5 च्या ऑर्डर 8 ऑक्टोबरपासून स्वीकारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये 128 जीबीच्या व्हेरियंटची किंमत ही Google Pixel 4A 5G च्या तुलनेत 200 डॉलर अधिक आहे. त्याचबरोबर जर्मनीमधील व्होडाफोनच्या पत्रकातील माहितीनुसार, Google Pixel 5 ची किंमत 630 डॉलर म्हणजेच जवळपास 46 हजार रुपये असणार आहे. 2020 मधील गुगलचा हा पहिलाच 5G स्मार्टफोन असणार आहे. त्यामुळे आता बाजारात विविध नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन आले असून कोणत्या मोबाईलशी याची टक्कर होते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या