नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला गूगलचा नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. गूगलने त्यांचा Google Pixel 5 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या गूगल पिक्सल 4चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. कंपनीने सर्वात आधी अमेरिकेत हा फोन लॉन्च केला. लवकरच Google Pixel 5 भारतासह इतर अन्य देशातही लॉन्च करण्यात येणार आहे.
Google Pixel 5, Pixel 4a 5G ची किंमत -
Google Pixel 5ची सुरुवातीची किंमत 699 डॉलर म्हणजे जवळपास 51,400 रुपये इतकी आहे. तर Pixel 4a 5Gची सुरुवातीची किंमत 499 डॉलर, जवळपास 37000 रुपये आहे. या दोन्ही फोनच्या 5जी व्हेरिएंटची विक्री ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, तायवान, ब्रिटन आणि अमेरिकेत होणार आहे. सध्या Google Pixel 5, Pixel 4a 5G भारतात लॉन्च होणार नाही.
Google Pixel 5 स्पेसिफिकेशन -
Pixel 5 मध्ये 6 इंची OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये पंचहोल कॅमेरा देण्यात आला आहे. Pixel 5 मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आहे. तसंच फोनमध्ये 4080mAh बॅटरी देण्यात आली असून, 18 वॅटच्या फास्ट चार्जिंग सपोर्टची सुविधा आहे. फोनला 5जी सपोर्टही देण्यात आला आहे.
Pixel 5 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. पहिला कॅमेरा 12.2 मेगापिक्सल असून कॅमेरासह फोनला इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशनही मिळणार आहे. तर दुसरा कॅमेरा 16 मेगापिक्सल असून फ्रन्ट कॅमेरा 8 मेगापिक्सल देण्यात आला आहे.
A water-resistant phone that creates quite a splash. The new #Pixel5 has 8 GB of RAM and wireless and reverse wireless charging to use with your Pixel Stand or to charge your Pixel Buds on-the-go.https://t.co/YYzCyiRlDR #LaunchNightIn pic.twitter.com/JB9NVMeWvK
— Made By Google (@madebygoogle) September 30, 2020
Google Pixel 4a 5G स्पेसिफिकेशन -
या फोनला एन्ड्रॉईड 11 सपोर्ट आहे. 6.2 इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. OLED डिस्प्ले असून त्याला गोरिला ग्लास 3चं प्रोटेक्शनही आहे. त्याशिवाय फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 G प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 3885mAh आहे. फोनला वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला नाही.
फोनला 12. 2 आणि 16 मेगापिक्सल असा रियर डुअल कॅमेरा देण्यात आला असून 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट, 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देण्यात आला आहे.