मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Pay झालं गायब? काय आहे नेमका प्रकार?

Google Pay झालं गायब? काय आहे नेमका प्रकार?

Digital Payment करणाऱ्यांना गोंधळात टाकणारी एक गोष्ट झाली आहे. Apple च्या App store वरून अचानक Google Pay गायब झालं.

    मुंबई, 26 ऑक्टोबर : डिजिटल पेमेंटची सवय नोटबंदीनंतर लागली नाही तेवढी लॉकडाऊनच्या काळात लागली. त्यात Google Pay, PayTm, Bhim app सारखी अनेक अॅप्लिकेशन्स आल्याने ही कॅशलेस सुविधा वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण डिजिटल पेमेंट करणाऱ्या अॅपल फोनच्या यूजर्सना धक्का बसेल अशी एक गोष्ट आज काही लोकांच्या लक्षात आली. Google Pay हे अॅप ios वरून गायब झालं. Apple च्या अॅप स्टोअरवरून काही काळासाठई Google Pay गायब झालं आहे. गुगल पे वर सर्च केलं तरी ते दिसणार नाही. iphone वापरणाऱ्या यूजर्ससाठी हे अॅप काही काळासाठी काढून टाकण्यात आलं आहे. Google च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "Google Pay हे Apple Store वरून तात्पुरतं काढून टाकण्यात आलं आहे. अपडेटेट गुगल प्ले स्टोअरमध्ये यूजर्सना ते पुन्हा वापरता येईल. पण काही काळासाठी आयफोनवरून ते गायब असेल." डिजिटल पेमेंट्स अॅपमध्ये Google Pay वापरणारे अनेक आहेत. त्यातल्या अॅपलच्या ग्राहकांना या निर्णयामुळे फटका बसला आहे. काही काळातच आयफोनवर गुगल पे चा पर्याय पुन्हा दिसू लागेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. Google ने हे पहिल्यांदाच केलं आहे, असं नाही. यापूर्वीही गुगल पे ही सुविधा काही काळासाठी थांबवण्यात आली होती. नव्या अपडेटसह ती पुन्हा आली. ऑगस्टमध्ये गुगल पेमध्ये काही एरर आल्याने तात्पुरतं बंद करण्यात आलं होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Google, Iphone

    पुढील बातम्या