Home /News /technology /

App ओपन न करताच Google Pay ने होईल पेमेंट, पाहा सोपी प्रोसेस

App ओपन न करताच Google Pay ने होईल पेमेंट, पाहा सोपी प्रोसेस

Google Pay ने पाइन लॅब्सच्या मदतीने एका फीचरची घोषणा केली आहे, जे UPI साठी Tap to Pay चा उपयोग करण्याची परवानगी देईल.

  नवी दिल्ली, 11 मे : आता ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करणं अधिकच सोपं झालं आहे. पेमेंट करण्यासाठी Payment App ओपन करण्याची गरज नाही. केवळ फोन एका मशिनला टच करुन काही सेकंदात पेमेंट होईल. अशीच सुविधा गुगल पेद्वारे (Google Pay) दिली जात आहे. Google Pay ने पाइन लॅब्सच्या मदतीने एका फीचरची घोषणा केली आहे, जे UPI साठी Tap to Pay चा उपयोग करण्याची परवानगी देईल. आतापर्यंत Tap to Pay फीचर केवळ कार्ड्ससाठी उपलब्ध होतं. आता हे फीचर यूपीआय युजरसाठीही (UPI) उपलब्ध होईल जे देशभरात कोणत्याही पाइन लॅब्स अँड्रॉइड पीओएस टर्मिनलचा (POS) उपयोग करुन ट्रान्झेक्शन करण्यासाठी आपल्या नीयर फील्ड कम्युनिकेशन (NFC) इनेबल अँड्रॉइड स्मार्टफोनचा उपयोग करू इच्छितो. ही सुविधा रिलायन्स रिटेलसह सुरू झाली आहे आणि आता फ्यूचर रिटेल, स्टारबक्स आणि इतर व्यापाऱ्यांकडेही उपलब्ध होईल. युजर्सला नवी सुविधा चांगल्या प्रकारे समजण्यासाठी गुगलने एक सपोर्ट पेजही लाँच केलं आहे. जर तुम्हाला UPI पेमेंटसाठी Tap to Pay फीचरचा उपयोग करायचा असेल, तर तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये NFC फीचर आहे की नाही ते तपासा. हे तपासण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. - सर्वात आधी अँड्रॉइड फोनमध्ये Setting ओपन करा. - बहुतेक अँड्रॉइड फोनमध्ये कनेक्शन सेटिंगमध्ये NFC फीचर असतं. हे फीचर असल्यास NFC and Contactless payment पर्यायावर क्लिक करा. - NFC असेल तर सर्च रिझल्टमध्ये दिसेल. तिथून फीचर इनेबल करू शकता.

  हे वाचा - कर्ज महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री, Car Loan चा EMI किती वाढणार? चेक करा डिटेल्स

  आता Google Pay द्वारे पेमेंट करताना कसं कराल - - सर्वात आधी फोन अनलॉक करा. त्यानंतर पेमेंट टर्मिनलवर फोन टॅप करा - Google Pay आपोआप ओपन होईल. - पेमेंट करण्याची रक्कम कन्फर्म करा आणि Proceed वर टॅप करा. पेमेंट झाल्यानंतर याची माहिती मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Online payments, Tech news, Upi

  पुढील बातम्या