आता तुमचा चेहरा करणार पैसे ट्रान्सफर, आलंय भन्नाट फिचर

आता तुमचा चेहरा करणार पैसे ट्रान्सफर, आलंय भन्नाट फिचर

आता तुमचा चेहरा करणार एका सेकंदाच देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशाबाहेरही ट्रान्सफर.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : एक काळ असा होता जेव्हा तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे असतील तर ते बॅंकेच जाऊन करावे लागत होते. त्यानंतर डिजीटायजेशनमुळे ऑनलाईन ही काम होऊ लागली. आता एका क्लिकवर तुमचे पैसे देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशाबाहेरही ट्रान्सफर केले जातात. मात्र आता तर फक्त तुमच्या चेहऱ्यानं हे काम होणार आहे.

गुगलची सर्वात मोठी ऑनलाईन पेमेंटची कंपनी गुगल पेनं (google pay) एक नवीन फिचर आणले आहे. गुगलने आपल्या या डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्ममध्ये (digital wallet platform) में बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन (biometric authentication) फीचर जोडले आहे. दरम्यान गुगल अॅड्रॉइड 10सोबत बायोमॅट्रिक सिक्योरिटी फिचर असणार आहे. ज्यामध्ये ऑनलाइन पेमेंट सिस्टम Google Payसाठी या फिचरचा वापर होणार आहे. यासाठी पहिल्यांदा पैसे ट्रान्सफर करताना युझरना PIN टाकून त्यानंतर या अॅपमध्ये बदल करावे लागणार आहेत.

वाचा-सावधान! तुम्ही VIDEO बघत बसताय पण हॅकर्स साधतायत संधी

गुगलनं आता या अॅपमध्ये biometric API सपोर्ट दिले आहे. यामुळं युझरचे पैसे आता फिंगरप्रिंट (fingerprint authentication) आणि फेस ऑथेंटिकेशनने (face authentication) ट्रान्सफर केले जाऊ शकतात. या नवीन फिचरमुळे एका सेकंदात तुमचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात.

सध्या हे फिचर त्याच फोनसाठी आहे, ज्या फोनमध्ये अॅड्रॉइड 10 काम करते.

वाचा-दोन दिवसांत करा हे काम, अन्यथा बंद होईल तुमचा मोबाईल नंबर

असा कराल या फिचरचा वापर

या अॅपमध्ये युझरना Sending Money असा पर्याय दिसेल. या पर्यायात यूझर PIN टाकून बायोमेट्रिकमध्ये पर्याय निवडू शकतात. ज्यामुळं एका सेकंदात तुमचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा की, biometric सिक्योरिटी फीचर केवळ पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देण्यात आले आहे. दुकानासाठी किंवा NFC पेमेंटसाठी हे फिचर काम करणार नाही. या फिचरचा वापर करण्यासाठी युझरना फोन अनलॉक करणे बंधनकारक असणार आहेय हे फिचर 2.100 व्हर्जनसोबत मिळणार आहे.

वाचा-‘या’ एका कारणामुळं भारतात लॉंच झाला नाही Google Pixel 4

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

Published by: Priyanka Gawde
First published: October 30, 2019, 12:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading