मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

पालकांना दिलासा; आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही

पालकांना दिलासा; आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही

कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : गुगल (Google) येणाऱ्या काही महिन्यात 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्ससाठी अनेक बदल करणार आहे. कंपनी गुगल अकाउंट्सबाबत (Google Accounts) बदल करणार आहे, जेणेकरुन लहान मुलांना ऑनलाईन फ्रॉडपासून (Online Fraud) वाचवलं जाईल. अनेक पालक मुलांमध्ये वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे काळजीत आहेत. त्यामुळे गुगलच्या या निर्णयामुळे आता पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. टेक कंपनी गुगलने बुधवारी आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंपनी 18 वर्षाहून कमी वय असलेल्यांसाठी लिंगाच्या आधारे जाहिरातींवर रोख लावेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही महिन्यात जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट (Google Update) करण्यास सुरू करणार आहे. Google वर जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणं हे लक्ष्य असून वयानुसार जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

नियमानुसार, 13 वर्षाखालील मुलं एक स्टँडर्ड Google अकाउंट बनवू शकणार नाहीत. त्यांना लिमिटेड फीचर्ससह गुगल अकाउंट वापरण्याची सूट मिळेल. उदा. आता 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलं YouTube डिफॉल्ट अपलोडचा वापर करू शकतील.

(कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना?असं तपासून करा हे सुरक्षित बदल)

Google मुलांच्या सेफ्टीसाठी सेफ सर्च (Safe Search) नावाचं फीचर आणणार आहे. यात मुलांचं गुगल अकाउंट कुटुंबियांसह लिंक असेल, ज्यात 13 वर्ष वयोगटातील मुलं साइन-इन करू शकतील. ते काय सर्च करतात, याची माहिती पालकांनाही मिळत राहील.

First published:

Tags: Google, Tech news