'वर बघा नाही तर आदळाल'; चालताना मोबाईल वापरणाऱ्या युजर्सला Google करणार अलर्ट

'वर बघा नाही तर आदळाल'; चालताना मोबाईल वापरणाऱ्या युजर्सला Google करणार अलर्ट

युजर्स चालता - चालता हातातला मोबाईल वापरत असल्याचं गुगलच्या लक्षात आल्यानंतर गुगलकडून 'हेड्सअप' (Heads Up) म्हणजे 'डोकं वर करून पुढे पाहा' असा संदेश देऊन युजर्सना सावध केलं जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : मोबाईल हा मानवी जीवनाचा इतका अविभाज्य भाग बनलाय, की जणू तो शरीराचा एखादा अवयवच आहे. अनेक जण हातात मोबाइल घेऊन गाडी चालवतात किंवा रस्त्यावर हातात मोबाईल घेऊन चालत असताना दिसतात. त्यातून अपघातही होतात. हातात मोबाईल घेऊन चालत असलेल्या व्यक्ती कुठे तरी जाऊन आपटतात किंवा खड्ड्यातही पडू शकतात. आता कोणतीही शंका आली, तरी त्या शंकेच्या निरसनसाठी गुगलची मदत घेतली जाते. आता वर उल्लेखलेली समस्या सोडवण्यासाठी गुगलनेच (Google) पुढाकार घेतला आहे.

गुगलच्या डिजिटल वेलबीइंग अ‍ॅप्लिकेशनमध्ये (Digital Wellbeing Android app) 'हेड्स अप' हे नवं फीचर गुगलकडून दिलं जाणार आहे. युजर्स चालता - चालता हातातला मोबाईल वापरत असल्याचं गुगलच्या लक्षात आल्यानंतर गुगलकडून 'हेड्सअप' (Heads Up) म्हणजे 'डोकं वर करून पुढे पाहा' असा संदेश देऊन युजर्सना सावध केलं जाणार आहे. सर्वांत पहिल्यांदा XDA Developres मध्ये गेल्या महिन्यात या फीचरबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली होती. डिजिटल वेलबीइंगच्या बेटा अपडेटसह गुगलच्या पिक्सेल स्मार्टफोनमध्ये (Pixel Smartphone) हे फीचर सादर केलं जाणार आहे.

'तुम्ही तुमचा फोन वापरत चालत असाल, तर तुमच्या आजू-बाजूला काय चाललंय, याकडे लक्ष देण्यासाठीचा रिमाइंडर मिळवा. सावध व्हा. 'हेड्स अप' हा तुम्ही स्वतःहून लक्ष देण्याकरता पर्याय नाही, हे लक्षात घ्या,' असं 'हेड्स अप'च्या सेटअप स्क्रीनवर लिहिलेलं आहे.

(वाचा - तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...)

'हेड्सअप' फीचरकडून 'Watch Your Steps' (तुमच्या पावलांकडे पाहा), 'Stay Alert' (सावध राहा), 'Look Up' (वर पाहा) अशा प्रकारची नोटिफिकेशन्स दिली जाणारआहेत. या अ‍ॅपबद्दल जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक माहितीत याचा समावेशआहे.

'हेड्स अप' हे फीचर सेट केल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही फोन वापरत चालत असाल, त्या प्रत्येक वेळी त्या फीचरकडून तुम्हाला नोटिफिकेशन पाठवलं जातं. डिजिटल वेलबीइंग अ‍ॅप्लिकेशनच्या सेटिंग्जमध्ये 'रिड्यूस इंटररप्शन्स' (Reduce Interruptions) या विभागात 'हेड्स अप' हे फीचर सापडेल. हे फीचर एकदा इनेबल केलं, की युजर्सना त्याच सेक्शनमध्ये आणखी काही सेटिंग्ज सापडतील.

हे फीचर वापरण्याकरता फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी, लोकेशन आणि फीडबॅक ऑप्शन याकरता परमिशन देण्याची गरज असते. या फीचरबद्दल प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक माहितीमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉट्सवरून हे स्पष्ट झालं आहे.

(वाचा - केंद्राचा मोठा निर्णय; Oxygen कंटेनरमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाईस लावणं अनिवार्य)

हे फीचर व्यापक स्वरूपात कधी लाँच होईल, याबद्दल गुगलकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या तरी केवळ गुगलच्याच पिक्सेल फोनवर उपलब्ध असलेलं हे फीचर नजीकच्या भविष्य काळात जास्तीत जास्त अँड्रॉइड फोन्सवर उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

First published: May 4, 2021, 8:50 PM IST

ताज्या बातम्या