आता 'Meena' मारणार तुमच्याशी मनसोक्त गप्पा, Googleचा नवा 'चॅटबॉट'

आता 'Meena' मारणार तुमच्याशी मनसोक्त गप्पा, Googleचा नवा 'चॅटबॉट'

‘मी कुणाशीही गप्पा मारू शकते’ असं वाक्य तुम्ही अनेक बोलघेवड्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. अशाच बोलघेवड्या लोकांसाठी Googleचं एक भन्नाट डिव्हाईस येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : ‘मी कुणाशीही गप्पा मारू शकते’ असं वाक्य तुम्ही अनेक बोलघेवड्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. अशाच बोलघेवड्या लोकांसाठी Googleचं एक भन्नाट डिव्हाईस येणार आहे. Meena नावाचा एक नवीन चॅटबॉट (बोलणारा असिस्टंट) गुगल तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. या चॅटबॉटशी तुम्ही हवा तेवढा वेळ गप्पा मारू शकता आणि ते सुद्धा एखाद्या व्यक्तीशी गप्पा मारल्यासारखं! Meena कडून मिळणारी उत्तरं देखील एखाद्या माणसासारखी असतील असा दावा गुगलकडून करण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा, गुगल असिस्टंट आणि अ‍ॅपल सीरी यांसारख्या व्हॉइस असिस्टंट अ‍ॅपच्या माध्यमातून माणसाने आपली अनेक कामं करून घेतली आहेत. मात्र गप्पा मारण्यासाठी हे असिस्टंट काहीसे कमी पडत असल्याचा अनुभव त्यांच्या यूजर्सकडून सांगण्यात आला. त्यामुळेच गुगल एक वेगळा असिस्टंट- 'Meena' तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. गप्पा मारण्यासोबतच Meena तुम्हाला जोक देखील सांगेल. 'Meena' म्हणजे जगभरातील विविध प्रकारच्या माहितीचं भांडार असणार आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार Meena ला 40 अब्ज शब्द शिकवण्यात आले आहेत. सर्वसामान्य यूजर्सना Meena कधीपासून वापरण्यासाठी उपलब्ध होईल याबाबत मात्र गुगलने माहिती दिलेली नाही

गुगलच्या Sensibleness and Specificity Average (SSA) या मापदंडाच्या माध्यमातून  नाव आहे. या मापदंडातून एखाद्याला प्रतिक्रिया देण्यासाठी संभाषण करणाऱ्या एजंटची काय क्षमता आहे ते तपासलं जातं. Meenaच्या संभाषण कौशल्य़ाची तपासणीही SSAच्या माध्यमातून करण्यात आली. SSA टेस्टमध्ये सामान्य माणसांना 86 टक्क्यापर्यंत रँकिंग मिळतं तर Meena ला यामध्ये 79% गुण मिळालेत. पण ही गुगलची स्वत:ची मापदंड प्रणाली आहे. मात्र गुगलचं गप्पा मारणारं Meena हे डिव्हाईस नक्कीच इंटरेस्टींग ठरेल.

अन्य बातम्या

सूर्याच्या पृष्ठभागावर सोन्याची चमक आणि मधमाशांची पोळी,पहिल्यांदाच समोर आले फोटो

TATA ची सगळ्यात सुरक्षित आणि स्वस्त कार 5.29 लाख रुपयात, जाणून घ्या फीचर्स

तुमच्या मोबाईलमध्ये लवकरच येणार 117 नवीन Emoji

First published: February 1, 2020, 9:30 AM IST

ताज्या बातम्या