Google च्या एका निर्णयानं मोबाईल नेटवर्कमधील अडचणी वाढणार!

Google ने त्यांची एक सेवा बंद केल्यानं मोबाईल नेटवर्कमधील अडथळे समजण्यास आणि ते दूर करण्यात अडचण निर्माण होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:09 PM IST

Google च्या एका निर्णयानं मोबाईल नेटवर्कमधील अडचणी वाढणार!

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : गुगलने आता त्यांची मोबाईल नेटवर्क इनसाइट ही सेवा बंद केली आहे. यामुळं भारतीय टेलिकॉम कंपन्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गुगलने Mobile Network Insights सेवा बंद केल्यानं रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कमधील त्रुटी दूर करणं कठीण होईल ज्या कारणामुळं लोकांना नेटवर्कमध्ये अडथळा येईल. टेलिकॉम कंपन्या या सेवेचा वापर नेटवर्क कव्हरेज वाढवण्यासाठी करत होत्या.

गुगलला ही सेवा देताना कायदा अडथळा ठरत होता. या सेवेमुळे गुगल कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता होती. यामुलं गुगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. गुगलने 2017 मध्ये मोबाईल नेटवर्क इनसाइट सेवा सुरु केली होती. गुगल यासाठी युजर्सच्या फोनचं लोकेशन आणि सिग्नलची स्ट्रेंथ ट्रॅक करत होते. मात्र, युजर्सचा डेटा शेअर केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती.

मोबाईल नेटवर्क इनसाइट ही सेवा गुगलतर्फे मोफत पुरवली जात होती. अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांना या सेवेमुळे कमी नेटवर्क असलेल्या भागाची माहिती प्राप्त होत होती. त्यानंतर संबंधित भागातील नेटवर्क वाढवण्यासाठी त्यांना पाऊल उचलणं सोपं जात होतं. मात्र, आता ही सेवा बंद केल्यानं नेटवर्कची समस्या सोडवणं कठीण होणार आहे. स्मार्टफोन युजरच्या प्रायव्हसी धोक्यात येत असल्यानं गुगलनं ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

गुगल प्रवक्ता विक्टोरिया किअफ यांनी म्हटलं आहे की, मोबाईल नेटवर्क सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून याबाबत टेलिकॉम कंपन्यांना माहिती देण्यात आली आहे. आम्ही अशा प्रोग्रॅमवर काम करत होत ज्यावर मोबाईल पार्टनर्सना नेटवर्क सुधारण्यासाठी मदत करत होतो. अजुनही आम्ही युजर्सना ऑफर देण्यात येणाऱ्या अॅप्स किंवा सेवांसाठी चांगलं नेटवर्क देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...