Home /News /technology /

Google कडून Gmail युजर्ससाठी मोठी बातमी; कंपनीने बंद केली ही सुविधा

Google कडून Gmail युजर्ससाठी मोठी बातमी; कंपनीने बंद केली ही सुविधा

अनेक अ‍ॅप्स ठरावीक कालावधीचे ग्रुप व्हिडिओ कॉल्स मोफत देतात. मात्र मीटिंग्ज त्यापेक्षाही लांबल्या, तर मात्र ती सुविधा मोफत दिली जात नाही. आता Google Meet नेही आपल्या सेवेसाठी तसा नियम लागू केला आहे. त्यामुळे गुगल मीट सरसकट मोफत वापरता येणार नाही.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 14 जुलै : कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यापासून बहुतांश जणांना घरात बसावं लागलं आहे. त्यामुळे ज्यांना कामं घरून करणं शक्य आहे, अशांसाठी गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि ऑनलाईन मीटिंग्ज हे रूटीनच बनलं आहे. या ऑनलाईन मीटिंग्जसाठी गुगल मीट (Google Meet), झूम (Zoom), वेबेक्स (Webex), मायक्रोसॉफ्ट टीम्स (MS Teams) अशी वेगवेगळी अॅप्स आहेत. त्यांची स्वतःची अशी वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. प्रत्येक अ‍ॅपची उपयुक्तता वेगवेगळी आहे. प्रत्येक जण स्वतःच्या आवश्यकतेनुसार कोणतं अ‍ॅप वापरायचं ते ठरवत असतो. अनेक अ‍ॅप्स ठरावीक कालावधीचे ग्रुप व्हिडिओ कॉल्स मोफत देतात. मात्र मीटिंग्ज त्यापेक्षाही लांबल्या, तर मात्र ती सुविधा मोफत दिली जात नाही. आता Google Meet नेही आपल्या सेवेसाठी तसा नियम लागू केला आहे. त्यामुळे गुगल मीट सरसकट मोफत वापरता येणार नाही. गुगल अकाउंट (Google Account) असलेली कोणीही व्यक्ती गुगल मीटद्वारे मीटिंग घेऊ शकते. त्यासाठी meet.google.com या लिंकवर जाऊन आपला जी-मेल आयडी (gmail ID) टाकून साइन अप करावं लागतं. त्यानंतर तयार होणारी लिंक संबंधित लोकांना पाठवून त्या लोकांशी मीटिंग अर्थात ग्रुप व्हिडीओ कॉल (Group Video Call) करता येतो. ज्यांचं गुगल अकाउंट नाही, त्यांना ही सेवा वापरण्यासाठी गुगल अकाउंट तयार करावं लागतं. पर्सनल गुगल अकाउंट मोफत असतं. त्यावर ई-मेल, गुगल मीटसह विविध प्रकारच्या सोयी, तसंच 15 जीबी क्लाउड स्पेसही मोफत मिळते. गुगल मीट वापरून तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा व्हिडीओ कॉल सुरू असेल, तर असा कॉल आता जास्तीत जास्त एक तास म्हणजेच 60 मिनिटांसाठीच सुरू ठेवता येऊ शकतो. जीमेलचं (गुगलचं) मोफत अकाउंट वापरणाऱ्यांसाठी ही मर्यादा घालून देण्यात आली आहे. असा कॉल सुरू असताना 55 मिनिटं झाली, की कॉलमध्ये असलेल्या सर्व सदस्यांना गुगलकडून एक नोटिफिकेशन पाठवण्यात येईल. 60 मिनिटं झाल्यावर कॉल कट होईल, याची कल्पना त्यांना देण्यात येते. त्यापुढेही कोणाला कॉल सुरू ठेवायचा असेल, तर गुगल अकाउंट अपग्रेड (Upgrade) करावं लागेल, असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

(वाचा - जुना फोन विकण्याआधी किंवा Exchangeकरण्यापूर्वी ही 3 कामं कराच;अन्यथा येईल समस्या)

वन टू वन (One to one) अर्थात केवळ दोघांचाच व्हिडीओ कॉल गुगल मीटद्वारे केला जात असेल, तर त्यासाठी मात्र वेळेची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. हा कॉल 24 तासही सुरू ठेवता येऊ शकतो, असं गुगलने म्हटलं आहे. याचाच अर्थ असा, की तीन किंवा त्यापेक्षा जास्त जणांना गुगल मीट वापरून मोफत व्हिडीओ कॉल करायचा असेल, तर त्यांच्या मीटिंगचा कालावधी जास्तीत जास्त एका तासाचाच असेल, अशी काळजी त्यांना घ्यावी लागेल. अशी मर्यादा घातली जाणार असल्याची चर्चा गेल्या वर्षीपासून सुरू होती. सप्टेंबर 2020 पर्यंत अशी मर्यादा घातली जाणार नाही, असं कंपनीने म्हटलं होतं. प्रत्यक्षात मात्र या क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहून गुगलने सप्टेंबर 2020 नंतरही आतापर्यंत वेळेचं बंधन घातलं नव्हतं.

(वाचा - 9 धोकादायक Apps कडून Facebook पासवर्ड्सची चोरी; पाहा कसं सुरक्षित ठेवाल तुमचं FB)

गुगल वर्कस्पेसची व्यक्तिगत सशुल्क सेवा मासिक 7.99 डॉलर अर्थात 740 रुपये एवढ्या दरात उपलब्ध आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील आणि जपान या पाच देशांमध्येच हा प्लॅन उपलब्ध असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. झूम (Zoom) या चिनी कंपनीचं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं. या अॅपद्वारेही मोफत कॉल करायचा असेल, तर 40 मिनिटांपर्यंतच्या कालावधीसाठीच ती सुविधा मोफत उपलब्ध आहे.
First published:

Tags: Gmail, Tech news

पुढील बातम्या