Home /News /technology /

घरून काम करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! Google Meet ने लावली मोफत VIDEO Call ला कात्री

घरून काम करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! Google Meet ने लावली मोफत VIDEO Call ला कात्री

Work from Home किंवा online शाळा, शिक्षण घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता VIDEO मीटिंगसाठी Google ला द्यावे लागणार पैसे.

    नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : Coronavirus च्या संकटकाळात शक्य आहे ते जवळपास सगळेच घरून काम करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन मीटिंगची संख्या वाढली आहे. विविध प्रकारची Apps  यासाठी उपलब्ध आहेत. Online call किंवा video conferencing हे व्हर्च्युअल शाळेसाठीसुद्धा वापरलं जात आहे. Google कोरोना काळात त्यांची Google meet ची सेवा फुकट देत आहे. पण आता महिन्याअखेरीपासून या सेवेसाठी पैसे मोजावे लागतील. VIDEO calling किंवा video conferencing च्या अनेक अॅप्सवर या मीटिंग मोफत घेण्याची सुविधा उपलब्ध असून काही Apps मात्र यासाठी पैसे घेत आहेत. गुगलनेदेखील गुगल Meet नावाची मीटिंग  सेवा सुरू केली होती. लॉकडाउनच्या काळात झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स यासारख्या अप आणि सुविधांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर मे 2020पासून गुगलनी Google Meet हे App मोफत उपलब्ध करून दिलं. या महिनाअखेरीनंतर म्हणजे 30 सप्टेंबरनंतर ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत, अशी माहिती गुगलच्या वतीने टेक पोर्टल - द व्हर्जला देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2020 पासून गुगल मीटवरील व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल केवळ 60 मिनिटांसाठी मोफत वापरता येईल. त्याहून मोठी मीटिंग असल्यास ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. Covid-19 ची साथ सुरू झाली आणि घरातच बसून काम करणं भाग पडलं. त्या वेळी मे महिन्यापासून गुगलने Gmail अकाउंट असणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये गुगल मीटचं बटण उपलब्ध करून दिलं होतं. त्यासोबत मिटवर मोफत अनलिमिटेड वेळेसाठी मीटिंग करण्याची ऑफर दिली होती.  त्यामुळे  Gmail अकाऊंटवरून मीटिंग आयोजित करणं सहज शक्य होत होतं. एकाचवेळी 250 जणांना जोडून मीटिंग करता येत होती त्याचबरोबर लाइव्ह-स्ट्रिमिंग करून 1 लाख लोकांपर्यंत एकाच डोमेनमधून पोहोचता येत होतं. या सुविधांचा लोकांनी पुरेपुर फायदा घेतला. शाळा-कॉलेजांचे वर्ग, कंपन्यांच्या मीटिंग, प्रेझेंटेशन सगळं काही गुगल मीटवरून सुरू झालं. झूम आणि मायक्रोसॉफ्टला गुगलनी यशस्वी टक्कर दिली. पण आता लॉकडाउन उघडत आहे आणि  शाळा ऑनालाइनच झाल्या आहेत त्यामुळे गुगलने सेवेचे पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधा मर्यादित केल्यानंतर ग्राहकांना G suit वापरायला लावणं हा गुगलचा उद्देश आहे. Appमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसून पाहिल्यासारख्या सुविधा यामध्ये मिळणार आहेत.फक्त त्यासाठी ग्राहकांना, शैक्षणिक संस्थांना  G Suite ही सुविधा पैसे देऊन वापरावी लागेल. अजूनही  60 मिनिटांपर्यंतचा कॉल मोफतच आहे. इतर सर्व सुविधा आणि मोठा कॉल या सुविधांसाठी ग्राहकांना प्रत्येक कनेक्शनसाठी दरमहा 25 अमेरिकी डॉलर म्हणजेच1825 रुपये मोजावे लागणार आहेत. या नव्या निर्णयामुळे वायफळ कॉलिंगला लगाम लागून केवळ महत्त्वाच्या कामांसाठीच या सेवांचा वापर केला जाईल. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांनाही हे शुल्क द्यावं लागणार असल्याने पालकांना अधिक फी भरावी लागू शकते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या