नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : कोरोना, लॉकडाउन काळात Work from Home चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यामुळे अनेक कंपन्या, कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून मीटिंगसह अनेक कामं करत आहेत. ऑनलाईन मीटिंगची संख्या वाढली आहे. विविध प्रकारची Apps यासाठी उपलब्ध आहेत. Online call किंवा Video Conferencing हे व्हर्च्युअल शाळेसाठीसुद्धा वापरलं जात आहे. अशात Google Meet चा सर्वाधित वापर केला गेला. आता Google Meet वर लवकरच एक भन्नाट फीचर येणार आहे. Google Meet ने लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं (Live Translated Captions) टेस्टिंग सुरू केलं आहे, ज्याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल.
Google ने दिलेल्या माहितीनुसार, Google Meet Video call आता अधिक ग्लोबल आणि प्रभावी होण्यासाठी हे फीचर मदत करेल. हे फीचर युजर्सला आपल्या भाषेत कंटेंटचा वापर करण्यासाठी, माहिती शेअर करण्यासाठी, शिकण्यासाठी मदत करेल.
एका रिपोर्टनुसार, Google Meet ने लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं टेस्टिंग सुरू केलं आहे, जे Google Meet च्या स्डँडर्ट लाइव्ह कॅप्शनच्या एक पाऊल वर आहे. हे फीचर सुरुवातीला इंग्रजीतील मीटिंग्सला सपोर्ट करेल, ज्याच ट्रान्सलेशन स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगालमध्ये केलं जाईल. यासाठी युजर्सला Settings मध्ये Captions वर स्विच करावं लागेल आणि खाली Translated Captions वर टॉगल करुन सेट करावं लागेल.
हे फीचर केवळ Google Workspace plus, Enterprise standard, Enterprise plus, Education plus, Education plus आणि Teaching and learning upgrade युजर्सद्वारे मीटिंग्ससाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.