Home /News /technology /

Google Meet चं अनोखं फीचर; Youtube वर स्ट्रीम करता येणार महत्त्वाच्या मीटिंग्ज, अशी आहे प्रोसेस

Google Meet चं अनोखं फीचर; Youtube वर स्ट्रीम करता येणार महत्त्वाच्या मीटिंग्ज, अशी आहे प्रोसेस

Google Meet आता इतर Google उत्पादनांसह अधिक इंटीग्रेशन मिळत आहे. यात आता पूर्वीपेक्षा जास्त सुविधा मिळणार आहे.

    नवी दिल्ली, 27 जुलै : गुगलकडून (Google) युझर्सना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. जी-मेल, गुगल मीट, गुगल सर्च या त्यापैकी काही प्रमुख सुविधा आहेत. यात गुगल मीट (Google Meet) ही एक लोकप्रिय सुविधा मानली जाते. गुगल मीटच्या माध्यमातून युझर्स मित्रमंडळी, नातेवाईक, तसंच ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी थेट संवाद साधू शकतात. कोरोना काळात प्रत्यक्ष भेटीगाठी आणि एकत्र कामकाज करण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा (Work From Home) पर्याय निवडला होता. या कालावधीत कार्यालयीन कामकाजासाठी, मीटिंग्जसाठी गुगल मीटचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. आतादेखील गुगल मीटचा वापर प्राधान्याने होत आहे. गुगलने मीट अ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर (Feature) आणलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युझर्सना (Streaming Platform) यू-ट्यूबवर (Youtube) मीटिंग लाइव्ह स्ट्रीम (Live Stream) करता येणार आहे. 'इतर गुगल प्रॉडक्ट्ससोबत गुगल मीट जोडण्यात येणार आहे. आता गुगल युझर्सना त्यांची मीटिंग मीटवरून थेट व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ही सुविधा एखाद्या अ‍ॅडमिनच्या (Admin) माध्यमातून मिळणार आहे. हा अ‍ॅडमीन मीट अ‍ॅपवरच्या (App) एखाद्या विशिष्ट मीटिंगच्या अ‍ॅक्टिव्हिटी पॅनेलवर जाऊन लाइव्ह स्ट्रीमिंगचा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. तसंच, त्याला लाइव्ह स्ट्रीम करू शकणाऱ्या मीटिंग चॅनेलचीही (Meeting Channel) निवड करता येणार आहे,' असं गुगलने म्हटलं आहे. 5G Auction: सुपरस्पीड ते अब्जावधींची बोली, कसं असेल नव्या पिढीचं इंटरनेट? `युझर्सना एखादी विशिष्ट माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर लाइव्ह स्ट्रीमिंग हे फीचर उपयुक्त ठरू शकतं. तसंच या फीचरमध्ये पॉज (Pause) आणि पुन्हा प्ले (Play) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय या फिचरच्या माध्यमातून मीटिंगनंतर युझर्सना प्रेझेंटेशन्सदेखील पाहता येतील,` असं गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्याने सादर होणार फीचर हे नवं फीचर टप्प्याटप्प्यानं रोलआउट (Rollout) केलं जाणार आहे. यात पहिला टप्पा `रॅपिड रिलीज` हा आहे. ही सुविधा 21 जुलैपासून काही ठराविक डोमेनसाठी (Domain) सुरू करण्यात आली आहे. दुसरा टप्पा 25 जुलैपासून सुरू होईल आणि तो 15 दिवसांपर्यंत सुरू राहील. लाइव्ह स्ट्रीम प्रक्रियेला यू-ट्यूबवर थेट जाण्याकरिता अप्रूव्ड मीटिंग उपलब्ध आहेत का याची खात्री करण्यासाठी एका प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. यासाठी यू-ट्यूबवर लाइव्ह स्ट्रीम सुरू होण्यापूर्वी यू-ट्यूबला विशिष्ट मीटिंग चॅनेल मंजूर करणं आवश्यक आहे. याचाच अर्थ युझर्सना केवळ मीटिंग लिंकवर क्लिक करून मीटिंग सेशन लाइव्ह स्ट्रीम करता येणार नाही, असं गुगलकडून सांगण्यात आलं. युझर्सनी या फीचरचा गैरवापर करू नये, यासाठी गुगल ही सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यावर भर देणार आहे, असंही कंपनीने सांगितलं.
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या