Home /News /technology /

आता Google Map सांगणार Corona Hotspot; तुमच्या आसपास किती Covid-19 रुग्ण आहेत, कसं पाहायचं?

आता Google Map सांगणार Corona Hotspot; तुमच्या आसपास किती Covid-19 रुग्ण आहेत, कसं पाहायचं?

कोणत्या परिसरात Coronavirus चे रुग्ण वाढले आहेत याची माहिती द्यायला नवं फीचर Google Map ने सुरू केलं आहे. कसं वापरायचं ते?

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : रस्ते हरवलेल्यांना योग्य मार्ग दाखवणारं Google Map आता कोरोना हॉटस्पॉट (Coronavirus hotspots) पण सांगणार आहे. तुम्ही जात असलेल्या परिसरात कोरोनारुग्णांची संख्या वाढलेली आहे का हे Google सांगू शकेल. कोणत्या परिसरात रुग्ण वाढले आहेत याची माहिती द्यायला नवं फीचर Google Map ने सुरू केलं आहे. कोरोनाचा संसर्ग (Covid-19) वाढल्यानंतर क्वारंटाईन, हॉटस्पॉट, कंटेन्मेंट असे एक ना अनेक नवे शब्द मोठ्या प्रमाणावर रोज कानावर पडत आहेत. पण आता Unlock ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर धोका असूनही अनेक जण कामासाठी बाहेर पडत आहेत. तुम्ही जाताय त्या भागात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे, ती वाढलेली आहे का हे सांगायला Google Map ने एक नवी संकल्पना विकसित केली आहे. कोरोना हॉटस्पॉटची माहिती गूगल मॅपवर मिळणार आहे. Google Map App च्या वरच्या बाजूला असलेल्या Covid 19 या पर्यायावर क्लिक केल्यावर एक लाख लोकसंख्येमागे किती रुग्ण विशिष्ट भागात आहेत, याची माहिती मिळेल. यासह विशिष्ट भागात किती रुग्ण वाढले किती कमी झाले ही माहितीही मिळेल, असं प्रॉडक्ट मॅनेजर सुजॉय बॅनर्जी यांनी सांगितलं. यामुळे लोकांना नक्की कोणत्या भागात जाणं धोक्याचं आहे, कुठे जाणं टाळावं हे ठरवण्यास मदत होणार आहे. ही सर्व माहिती यूजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी बाल्टीमोरच्या जॉन्स हॉपकिन्स रुग्णालय, न्यूयॉर्क टाईम्स, विकिपीडीया यासारख्या स्त्रोतांकडून हा सर्व डेटा उपलब्ध झाला आहे. यासह जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) माहिती घेण्यात आल्याचं बॅनर्जी यांनी सांगितलं. Google Mapने आधी कोरोना साथीच्या संदर्भातील माहिती देणारी टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यात कुठल्या भागात गर्दी जास्त आहे हे समजतं. कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असताना तुम्ही कोणत्या भागात जाणं सुरक्षित असेल याची माहिती Google Mapच्या मदतीने तुम्हाला देणं हे महत्त्वाचं ठरणार आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या कोरोना काळात Google Map नी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा कुठे उपलब्ध होतील, याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. या सेवाकेंद्रांच्या माहितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत राहून अधिकाऱ्यांच्या मदतीने याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. शासकीय यंत्रणेनी उपलब्ध करून दिलेली भोजनाची तसंच निवासाची व्यवस्था लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य या काळात करण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत ही माहिती पोहचवणं हा उद्देश होता, असे सांगण्यात आलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Google

    पुढील बातम्या