मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Maps चं नवं फीचर, आता प्रवास करणं आणखी सोपं होणार

Google Maps चं नवं फीचर, आता प्रवास करणं आणखी सोपं होणार

Google Maps ने अनेक नवे अपडेट्स आणले आहेत. यामुळे प्रवास अधिक सोपा होणार आहे. आता नव्या फीचरमुळे प्रवासादरम्यान किती टोल प्लाझा येतील, किती टोल टॅक्स भरावा लागेल याची माहिती आधीच मिळेल.

नवी दिल्ली, 9 एप्रिल : Google Maps ने अनेक नवे अपडेट्स आणले आहेत. यामुळे प्रवास अधिक सोपा होणार आहे. आता नव्या फीचरमुळे प्रवासादरम्यान किती टोल प्लाझा येतील, किती टोल टॅक्स भरावा लागेल याची माहिती आधीच मिळेल. यामुळे टोल असणाऱ्या रोडवरुन जायचं की कोणत्या दुसऱ्या रोडचा मार्ग निवडायचा याचा निर्णय घेता येईल. मॅपमध्ये हेदेखील समजेल, की कोणत्या वेळी किती टोल टॅक्स लागतो.

Google वर टोल रोड प्रोसेसिंगची ही सुविधा अँड्रॉइड आणि iOS युजर्ससाठी याच महिन्यात सुरू होणार आहे. यात अमेरिका, भारत, जपान आणि इंडोनेशिया अशा देशातील 2000 टोल रोडची माहिती दिली जाईल. काही आठवड्यात गुगल मॅप ट्रफिक लाइट, स्टॉप साइन, बिल्डिंग आउटलाइन, रस्त्यांची रुंदी अशा गोष्टींसह अनेक गोष्टींची माहिती ड्रायव्हिंग करताना मिळेल. यामुळे अगदी शेवटच्या क्षणी लेन बदलणं, अनावश्यक टर्नपासून सुटका होण्यास मदत होईल असं कंपनीने म्हटलं आहे.

हे वाचा - रस्त्यावर अपघात आणि चालान कापण्यापासून वाचवेल Google Maps, ड्रायव्हिंगवेळी करेल अलर्ट

iPhone आणि iPad युजर्ससाठी गुगल एक नवं Widget आणणार आहे, ज्यामुळे युजर्स गो टॅब पिन करू शकतात. यामुळे युजर्सला आधीच समजेल की एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल.

हे वाचा - विना Internet ही वापरता येईल Google Maps, पाहा सोपी ट्रिक

दरम्यान, ड्रायव्हिंग करताना जर तुम्ही अपघाती भागात (Accidental Area) गेलात, तर तुमच्या फोनवर याबाबत अलर्ट केलं जाईल. अपघाती भागाबाबत ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट तुमच्या फोनवर दिला जाईल. यासाठी MapmyIndia चं Move App डाउनलोड करावं लागेल. हे App केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लाँच केलं होतं. MapmyIndia ने IIT Madras सह मिळून हे Move App डेव्हलप केलं आहे. हे App युजर्सला त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या ब्लॅक स्पॉटबाबत अलर्ट करेल, जेणेकरुन ड्रायव्हर सावधगिरी बाळगू शकतील आणि पुढील प्रवास, ड्रायव्हिंग सावधपणे करू शकतील.

First published:
top videos

    Tags: Google, Tech news