Home /News /technology /

google map मध्ये आता Community Feeds; काय आहे त्याचा फायदा पाहा

google map मध्ये आता Community Feeds; काय आहे त्याचा फायदा पाहा

google map मध्ये आता तुमच्यासाठी आणखी एक फिचर आणलं आहे.

    नवी दिल्ली, 02 डिसेंबर : जर एखाद्याला पॉप्युलर रेस्टॉरंट्स, व्यवसाय, चांगले स्पॉट्स आणि त्यांच्या सभोवतालची आणखी काही ठिकाणे शोधण्यासाठी आणि संबंधित ठिकाणी स्वतःला नॅव्हिगेट करून जायचे असेल तर यासाठी गुगल मॅप्स (Google Maps) उपयुक्त अ‍ॅप आहे. गुगल आता ही कार्यक्षमता नवीन कम्युनिटी फीडसोबत (Community Feeds) वाढवत आहे जी जवळपासच्या ठिकाणांबद्दल अधिक अपडेट्स देते. कम्युनिटी फीड गुगल मॅप्स अ‍ॅपवरील 'एक्सप्लोर' टॅबवर दर्शविला जाईल आणि युझर्सनी मॅप्सवर फॉलो केलेल्या लोकप्रिय स्थानांसाठी अपडेट्स दर्शवेल. हे लोकल एक्स्पर्ट्सनी गुगल मॅप्सवर लिहिलेले लेटेस्ट रिव्ह्यू, फोटो आणि पोस्ट दर्शवेल आणि युझर्स फॉलो करीत असलेले लोकदेखील हे पाहता येतील. गुगलने म्हटले आहे की कम्युनिटी फीड उपयुक्त स्थानिक माहिती एकत्र आणते आणि युझर्सच्या निवडलेल्या आवडीनुसार त्याचा क्रम लावते. उदाहरणार्थ, युझर्सने त्यांच्या गुगल मॅप्स फूड प्रेफरन्सनुसार हेल्दी फूड किंवा ग्रीक फूडमध्ये इंटरेस्ट दर्शवला असेल तर त्यांना त्या प्रकारच्या गोष्टींसाठी अधिक रेकमेंडेशन्स, फोटो आणि व्यवसाय पोस्ट दिसतील. कम्युनिटी फीड विश्वसनीय स्थानिक स्त्रोतांनी केलेले अपडेट्स आणि रेकमेंडेशन्स दर्शवेल. गुगलने सांगितले की नवीन कम्युनिटी फीड व्यवसायांनाही मदत करेल ज्यामुळे ग्राहकांना हे व्यवसाय मॅप्सवर शोधणे सोपे होईल. गुगलने म्हटले आहे की कम्युनिटी फीडच्या चाचणी दरम्यान, हे लक्षात आले की व्यापारी फीड्सच्या तुलनेत व्यापार्‍यांकडील पोस्ट दुप्पट वेळा पाहिल्या जातात. हे वाचा - iPhone वॉटरप्रूफ असल्याचं सांगणं Apple कंपनीला पडलं महागात;लागला 88 कोटींचा दंड कम्युनिटी फीड्सच्या माध्यमातून त्यांच्या आवडीचे स्पॉट्स, व्यवसाय सेवांवरील अपडेट्स, रिव्ह्यू आणि रेटिंग्ज, फोटो इतर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे, अपडेटेड पत्ते आणि बरेच काही यासह 20 लाखांहून अधिक कॉन्ट्रिब्युशन्सचा वापर केला आहे. "आम्ही गुगल मॅप्सच्या एक्सप्लोर नाउ टॅबमध्ये नवीन कम्युनिटी फीडसोबत विश्वसनीय स्थानिक स्त्रोतांकडील अपडेट्स आणि रेकमेंदेशन्स शोधणे सोपे करत आहोत," असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. हे वाचा - आजच जाणून घ्या कार, बाईकसंबंधी नवे 5 नियम; अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स गुगलच्या या नवीन अपडेटनंतर युझर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि गुगल मॅप्स वापरणे सुद्धा सोयीस्कर होईल. या अपडेटने अनेक छोट्या व्यावसायिकांचा देखील फायदा होईल. या पुढे सुद्धा गुगल आपल्या इतर अ‍ॅप्समध्ये ही निरनिराळे अपडेट्स आणणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या