नवी दिल्ली, 8 जानेवारी : अनेकदा आपण अशा ठिकाणी अडकतो जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. अशावेळी एखाद्यासोबत आपलं लोकेशन शेअर करता येत नाही. परंतु विना इंटरनेटही आपलं लोकेशन दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता येऊ शकतं.
स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यासही, लोकेशन पाठवता येईल. फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा. त्यानंतर युजरला गुगल मॅपवर आपलं लोकेशन जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी कॉलनीचं नाव, ब्लॉक आणि आसपासच्या लँडमार्कची मदत घेता येऊ शकते. त्यानंतर गुगल मॅपवर दाखवला जात असलेल्या, आसपासच्या लँडमार्कवर पोहचा. त्या जागेवर काही वेळ टच करून ठेवा. त्यानंतर त्या लोकेशनवर रेड डॉट येईल. त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला तीन पर्याय दिसतील. पहिला डायरेक्शन, दुसरा शेअर आणि तिसरा सेव्ह.
लोकेशन शेअर करण्यासाठी तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर टेक्स्ट मेसेजचा पर्याय निवडा. आता ते लोकेशन कोणासोबतही शेअर करू शकता. त्याशिवाय गुगल मॅपमध्ये लाल रंगाचा बिंदु आल्यानंतर, खालच्या बाजूला दिलेल्या डायरेक्शनचाही वापर करू शकता. इंटरनेट नसताना, गुगल मॅप केवळ त्याच ठिकाणांपर्यंत पोहचण्याचा रस्ता दाखवतो, जो गुगल मॅपमध्ये आधीपासूनच सेव्ह आहे.
SMS लोकेशन -
SMS द्वारे लोकेशन पाठवण्यासाठी आरसीएस सर्व्हिस अर्थात रिच कम्यूनिकेशन सर्विसेज उपलब्ध आहे. याअंतर्गत SMS द्वारे दुसऱ्या युजरला मल्टीमीडिया कंटेंट शेयरिंगद्वारे लोकेशन पाठवता येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.