Google ने सर्व वायर्ड हेडफोन्ससाठी असिस्टंट सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. 9 टू 5 गुगल संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तुमचा हेडफोन टाइप-सी किंवा 3.5 मिमी अशा कोणत्याही प्रकारातला असला, तरी ही सुविधा तुमच्या वायर्ड हेडफोन्सवर कार्य करणार आहे. जेव्हा तुम्ही तुमचा वायर्ड हेडफोन्स तुमच्या मोबाइलला टाइप-सी किंवा 3.5.mm हेडफोनद्वारे जोडाल तेव्हा गूगल असिस्टंटकडून तुम्हाला एक नोटीफिकेशन प्राप्त होईल.
त्या नोटीफिकेशनवर टॅप केल्यानंतर सेटअप प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर मोबाइल वापरकर्त्याकडून ही सुविधा कार्यान्वित करण्याची परवानगी मागितली जाईल, वापरकर्त्यांनी ओके बटनावर क्लिक केल्यानंतर गुगल असिस्टंटच्या माध्यमातून फोनवर येणार्या नोटीफिकेशन वाचण्यास सुरूवात होईल. पण तत्पूर्वी मोबाइल वापरकर्त्याला आणखी काही परवानग्या द्याव्या लागतील, ज्यामुळं हे नवीन सेटअप प्रक्रिया पूर्ण होईल.
व्हॉईस कमांड देण्यासाठी इयरफोनवरील कॉल स्विकारण्याच्या बटणाला सिंक करणं आवश्यक आहे. Google असिस्टंटद्वारे तुम्ही व्हॉईस कमांडच्या माध्यमातून पर्सनल सर्च रिजल्ट आणि कॅलेंडरशी संबंधित माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला मोबाइल अनलॉक करण्याचीही गरज भासणार नाही.
सध्या गुगलने हे नवीन फिचर केवळ काही वायरलेस ब्लूटूथ हेडफोन्सवर उपलब्ध करून दिलं आहे. शिवाय Google पिक्सलच्या यूएसबी-C च्या बड्सवर देखील ही सुविधा सुरू केली आहे.
गुगलने हे नवीन फिचर देखील जोडले आहेत...
गेल्या काही महिन्यांपासून गुगलने बर्याच पर्यायांमध्ये नवीन फिचर उपलब्ध करुन दिली आहेत. अलीकडेच गुगलने 'गुगल सर्च इंजिन' मध्ये नवीन फिचर समाविष्ट केली आहेत. एका अहवालानुसार, कंपनीची ही नवीन वैशिष्ट्ये वापरकर्त्यासाठी खूप युजरफ्रेन्डली आहेत. असं सांगितलं जात आहे, की गुगलवर एखादी बाब सर्च केल्यानंतर वापरकर्त्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होतील. सर्च इंजिनमधील नवीन वैशिष्ट्यांनुसार, सर्च करत असाताना कोणताही विषय मर्ज करून रिजल्ट दाखवले जातील. त्यामुळं वापरकर्त्यांना अधिक फायदा होईल आणि हव्या असलेल्या माहितीपाशी सहज पोहचता येईल.