Google ला सगळं कळतं; तुमच्या 'या' सवयी नोंदल्या जात आहेत सर्च इंजिनमध्ये

Google ला सगळं कळतं; तुमच्या 'या' सवयी नोंदल्या जात आहेत सर्च इंजिनमध्ये

जीमेल अकाउंटवर आलेल्या पेमेंट रिसिप्टच्या माध्यमातून तुमच्या ऑनलाईन खरेदीवर गुगल ठेवतं लक्ष

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे : तुमच्या ऑनलाईन खरेदीवर गुगलचं पूर्ण लक्ष असतं. सीएनबीसी च्या एका वृत्तानुसार, जीमेल अकाउंटवर आलेल्या पेमेंट रिसिप्टच्या माध्यमातून गुगल तुमच्या ऑनलाईन खरेदीवर लक्ष ठेवतं. यासंदर्भात प्रकाशित रिपोर्टनुसार ही माहिती वेब टूलच्या माध्यमातून युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वेब टूल तुमचा सगळा डेटा गुप्त ठेवतं असा कंपनीचा दावा आहे. तर या माहितीचा उपयोग जाहिरात करण्यासाठी अजिबात केला जात नसल्याचं गुगलने म्हटलं आहे.

मायक्रोएसडी कार्डच्या विश्वातही क्रांती; 'या' कंपनीने लाँच केलं 1TB मेमरी कार्ड

जीमेल मॅसेजच्या माध्यमातून एकत्रित झालेल्या डेटाचा उपयोग जाहिरातीसाठी करणार नाही असं कंपनीने 2017 मध्ये म्हटलं होतं. ''तुम्हाला एखाद्या ठिकाणी केलेल्या खरेदीवर, बुकिंवगर आणि सबस्क्रिप्शनवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही एक केंद्र तयार केलं आहे, जे तुम्ही पाहू शकता'', असं 'द वर्ज'मध्ये गुगलने म्हटलं आहे. तुम्ही ही माहिती केव्हाही डिलीट करू शकता, असं कंपनीने पुढे म्हटलं आहे. हे सगळं स्पष्ट करताना गुगलने हे टूल केव्हापासून अॅक्टिव्ह आहे हे स्पष्ट केलं नाही.

तरुणांसाठी नेव्हीमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी; असा करा अर्ज

प्रायव्हसीशी निगडित कमतरता दूर करण्यासाठी जगभरातून करण्यात आलेल्या मागणीनंतर गुगलने आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या युजर्ससाठी अतिरिक्त सुरक्षा आणि प्रायव्हसी टूल्सची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात युजर्सना त्यांचं लोकेशन हिस्ट्री तसंच बेव आणि अॅपबाबतची माहीती सुरक्षित ठेवण्यासाठी कालावधी निवडण्याची सुविधा दिली होती.

First published: May 19, 2019, 5:37 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading