• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Google वर अशाप्रकारे पॉर्न सर्च करताय? सावधान, तुमच्यावर ठेवली जातेय नजर

Google वर अशाप्रकारे पॉर्न सर्च करताय? सावधान, तुमच्यावर ठेवली जातेय नजर

जर तुम्हीही गुगल क्रोमवर (Google Chrome) पॉर्न सर्च (Porn) करत असाल, तर सावध व्हा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जून: जर तुम्हीही गुगल क्रोमवर (Google Chrome) पॉर्न सर्च (Porn) करत असाल, तर सावध व्हा. अशाप्रकारे सर्च करणं तुमच्यासाठी समस्या निर्माण करणारं ठरू शकतं. काही लोक गुगल क्रोमवर इनकॉगनिटो मोडचा (Incognito Mode) वापर पॉर्न सर्च करण्यासाठी करतात. असं सर्च केल्यानं त्यांना कोणी पाहू शकत नाही असं वाटतं. परंतु गुगल या सर्व सर्चवर लक्ष ठेवतो. Google इनकॉगनिटो मोडमध्ये अधिक टॅब ओपन करणाऱ्यांवर नजर ठेवतो. इंडिपेंडेंट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा युजर इनकॉगनिटो मोडमध्ये सर्च करताना 100 हून अधिक टॅब्स ओपन करत असेल, त्यावेळी गुगलच्या अॅड टॅब काउंटरच्या जागी Smiley किंवा विंक असा इमोजी दिसतो. अशाप्रकारे इमोजीद्वारे गुगल त्या युजरवर लक्ष ठेवत असल्याचं सांगत असतो.

  (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

  मॅशेबलनुसार, गुगल क्रोममध्ये दोन कॅरेक्टर दिसतात. 100 टॅब्स ओपन केल्यानंतर, टॅब काउंटरच्या जागी Smiley दिसू लागतात. या स्मायलीमागे किंवा विंकमागे नेमकं कारण काय हे अद्याप माहित नसलं, तरी गुगलकडून तुम्ही गरजेहून अधिक पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं जाण्याची ही पद्धत असू शकते. त्यामुळे गुगल क्रोममध्ये इनकॉगनिटो टॅबमध्ये अशाप्रकारे पॉर्न पाहत असाल, तर सावध राहणं गरजेचं आहे.

  (वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

  दरम्यान, गुगल ट्रेंडमध्ये (Google Trend) मागील पाच वर्षातील अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा भारतीयांमध्ये फ्री पॉर्नऐवजी ट्रेडिंग अर्थात शेअर बाजार सर्वाधिक ट्रेंड करत होता. पॉर्नऐवजी लोक शेअर बाजारासंबंधी माहिती गुगलवर सर्च करत होते. गुगल ट्रेंडचा आलेख स्पष्टपणे दर्शवतो, की भारतीयांचा शेअर बाजाराकडे कल प्रचंड वाढला आहे. या महिन्यात Free Porn चा सर्च ग्राफ ट्रेडिंग सर्च ग्राफच्या खाली होता.
  Published by:Karishma
  First published: