मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google कडून तुमच्या संपूर्ण अ‍ॅक्टिव्हिटीचं होतं ट्रॅकिंग, सोप्या पद्धतीने असं करा बंद

Google कडून तुमच्या संपूर्ण अ‍ॅक्टिव्हिटीचं होतं ट्रॅकिंग, सोप्या पद्धतीने असं करा बंद

आपण गुगलवर करत असलेले सर्च, पाहत असलेली जाहिरात (Ads), व्हिडीओ (Video) अशी सगळी माहिती गुगलकडे नोंद होत असते आणि त्यावरून आपल्याला आपण केलेल्या सर्चशी संबधित जाहिराती येत असतात.

आपण गुगलवर करत असलेले सर्च, पाहत असलेली जाहिरात (Ads), व्हिडीओ (Video) अशी सगळी माहिती गुगलकडे नोंद होत असते आणि त्यावरून आपल्याला आपण केलेल्या सर्चशी संबधित जाहिराती येत असतात.

आपण गुगलवर करत असलेले सर्च, पाहत असलेली जाहिरात (Ads), व्हिडीओ (Video) अशी सगळी माहिती गुगलकडे नोंद होत असते आणि त्यावरून आपल्याला आपण केलेल्या सर्चशी संबधित जाहिराती येत असतात.

    नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : आजकाल आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल, तर आपण अगदी सहजपणे Google Search करतो. गुगलचा आपल्या आयुष्यात इतका शिरकाव झाला आहे, की आपण काय शोधतो, आपल्याला काय आवडतं हेदेखील गुगलला माहीत असतं. आपण गुगलवर करत असलेले सर्च, पाहत असलेली जाहिरात (Ads), व्हिडीओ (Video) अशी सगळी माहिती गुगलकडे नोंद होत असते आणि त्यावरून आपल्याला आपण केलेल्या सर्चशी संबधित जाहिराती येत असतात. आपण काय सर्च करतोय, काय बघतोय हे गुगलला कळू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु ते शक्य आहे का आणि असल्यास ते कसं करायचं हे माहीत नसतं.

    - Google कडून आपण जी माहिती मिळवतो ती सहा गटांमध्ये विभागण्यात आली आहे. त्यात वेब (Web) आणि अ‍ॅपवर (App) सगळ्यात जास्त सर्च केलं जातं. गुगल ब्राउझरवरून लॉग इन केल्यानंतर संबंधित लिंक त्या पेजवर घेऊन जाते. त्या वेळी स्क्रीनवरची टॉगल बटणं वापरून तुम्ही गुगलचं ट्रॅकिंग (Google Tracking) थांबवू शकता.

    - वेबवर Google Chrome मध्ये साइन इन केल्यावर किंवा गुगलमध्ये साइन इन असताना आणि गुगल अ‍ॅप्समध्ये तुम्ही जे करता त्या सर्व गोष्टींची नोंद गुगलकडे होत असते. या नोंदी किती बारकाईने केल्या जातात हे बघायचं असेल, तर वेब आणि अ‍ॅपमध्ये Manage Your Activity या पर्यायावर क्लिक करा. नंतर तारीख आणि प्रॉडक्टनुसार फिल्टर निवडा.

    - आता Android मध्ये Filter वापरून नको असलेली माहिती एकत्रित करून ट्रॅशमध्ये टाकली जाते. त्याप्रमाणे इथंही फिल्टर वापरून नको असलेली माहिती एकत्र करून ती नष्ट करू शकता. अन्य एकेकच असणाऱ्या नोंदी बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून डिलीट करू शकता. एकाचवेळी सगळ्या नोंदी डिलीट करायच्या असतील, तर डावीकडे जाऊन सर्व डिलीट करण्याचा पर्याय येतो.

    - वेब आणि अ‍ॅपमधल्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी डिलीट करण्यासाठी All Time आणि All Products फिल्टर वापरून एकाच वेळी सर्व नोंदी डिलीट (Delete) करता येतात. यासाठी सध्या आणखी एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे गुगल आपोआपच तीन महिन्यांपेक्षा किंवा 18 महिन्यांपेक्षा जुना डेटा हटवते. यासाठी तुम्हाला अ‍ॅक्टिव्हिटी लिस्टमध्ये Remove Automatically हा पर्याय निवडावा लागतो.

    Smartphone Tips: फोन चोरी झाला किंवा हरवल्यानंतर असा डिलीट करा तुमचा डेटा

    तसंच अनेक जण सर्चसाठी Google Assistant ची मदत घेतात. अनेकदा हा गुगल असिस्टंट कोणतीही ऑर्डर किंवा सूचना दिली नसतानादेखील सुरू झालेला आढळतो.

    Google Assistant टाळण्यासाठी अतिशय सोपी पद्धत-

    - तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर ‘Hey Google, Open Google Assistant’ अशी ऑर्डर देऊन हे सेटिंग्ज ओपन करा. नंतर All Options मध्ये General हा पर्याय निवडा. नंतर गुगल असिस्टंट चालू किंवा बंद करा.

    - आणखी एक पद्धत म्हणजे Google App ओपन करा. तळाशी असलेल्या टूलबारमध्ये तीन डॉट्स दिसतील.

    - सेटिंग्ज सिलेक्ट करून त्यातून Google Assistant निवडा. Assistant मध्ये ‘फोन’चा पर्याय निवडा. नंतर गुगल असिस्टंट बंद करण्यासाठी टॉगल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक पॉप-अप मेसेज दिसेल, ज्यात हे फीचर्स कार्यरत नसल्याचं स्पष्ट होईल. त्यानंतर ‘Turn Off’ बटणावर क्लिक करा. अचानक सुरू होणाऱ्या गुगल असिस्टंटच्या त्रासातून तुमची सुटका झालेली असेल.

    Instagram Post डिलीट झाली? सोप्या पद्धतीने अशी करता येईल रिकव्हर

    गुगलकडून माहितीची नोंद होत असल्याने युजर्सची प्रायव्हसी जपण्याच्या अधिकारावर गदा येत असल्याबद्दल आरोप केले जातात; पण त्यावर काहीही उपायोजना होत नसली तरी या काही मार्गांनी आपण गुगलचा पहारा चुकवू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Google, Tech news