मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google ने प्ले स्टोअरवर बॅन केले प्रसिद्ध Muslim Prayer अॅप;काय आहे नेमकं कारण?

Google ने प्ले स्टोअरवर बॅन केले प्रसिद्ध Muslim Prayer अॅप;काय आहे नेमकं कारण?

 आपण दिवसभरात अनेक गोष्टींची माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर करतो. कदाचित सध्या अशी एकही गोष्ट नसेल जी गुगलवर उपलब्ध नाही. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास 'गुगलबाबा' समर्थ आहे. सध्या गुगल ही जगातली सर्वांत मोठी सर्च इंजिन (Search Engine) कंपनी आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट 'गुगल' (Google) अतिशय उपयुक्त ठरत आहे.

पुढे वाचा ...

 मुंबई, 9 एप्रिल-   आपण दिवसभरात अनेक गोष्टींची माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर करतो. कदाचित सध्या अशी एकही गोष्ट नसेल जी गुगलवर उपलब्ध नाही. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास 'गुगलबाबा' समर्थ आहे. सध्या गुगल ही जगातली सर्वांत मोठी सर्च इंजिन (Search Engine) कंपनी आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट 'गुगल' (Google) अतिशय उपयुक्त ठरत आहे. गुगलशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाइफची कल्पनाही करू शकत नाही. गुगलची अनेक अ‍ॅप्स (Google Apps) आपलं आयुष्य खूप सुखकर करतात; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये गुगल वापरणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत (Google Security) प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरच्या काही अ‍ॅप्सवर बंदीची (Ban) कारवाई सुरू केली आहे. आता पुन्हा एकदा गुगलनं अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. नुकत्याच बॅन केलेल्या अ‍ॅप्समध्ये काही फेमस मुस्लिम प्रेअर अ‍ॅप्सचाही (Muslim Prayer Apps) समावेश आहे. या अ‍ॅप्सचे आतापर्यंत एक कोटीहून अधिक डाउनलोड्स झाले होते. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रिसर्चरनं दिलेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोअरवरच्या अनेक अ‍ॅप्समध्ये मालवेअर (Malware) होती. त्यांचा वापर करून युझर्सची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि इतर डेटा मिळवला जात होता. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तामध्ये असं म्हटलं आहे, की जेव्हा युझर्स त्यांच्या फोनवर अशी अ‍ॅप्स इन्स्टॉल करतात तेव्हा ती डिव्हाइस आणि त्यातला डेटा कॅप्चर करतात. यात फोन नंबर आणि ई-मेल आयडी यांसारख्या माहितीचा समावेश होतो. हा मालवेअर कोड अ‍ॅपसेन्ससच्या (AppCensus) सर्ज एगेलमन (Serge Egelman) आणि जोएल रीअर्डन (Joel Reardon) यांनी शोधला होता. मोबाइल युझर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी जपण्यासाठी अ‍ॅपसेन्सस टूल विविध अ‍ॅप्सची तपासणी करतं.

रीअर्डननं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे, की या त्रुटींबद्दल सर्वप्रथम अ‍ॅपसेन्ससनं गुगलशी संपर्क साधला होता. गेल्या वर्षी (2021) ऑक्टोबरमध्ये गुगलला याबद्दल माहिती दिली गेली होती. वॉर्निंग मिळूनही 25 मार्चपर्यंत (2022) मालवेअर असलेली अ‍ॅप्लिकेशन्स प्ले स्टोअरवरून काढण्यात आली नव्हती. नंतर मात्र गुगलने त्याची चौकशी सुरू केली आणि ती अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून हटवली. गुगलनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे, की गुगल प्लेवरची सर्व अ‍ॅप्स कंपनीची पॉलिसी (Google Policy) आणि गाइडलाइन्सनुसारच (Google Guidelines) चालवावी लागतील. कोणत्याही अ‍ॅपने कंपनीच्या स्टँडर्ड्सचं उल्लंघन केलं तर त्यावर आवश्यक कारवाई केली जाईल.

गुगलनं कारवाई केलेल्या अ‍ॅप्समध्ये अल मोझिन (Al Moazin) आणि किब्ला कंपास (Qibla Compass) यांसारख्या एक कोटीं अधिक डाउनलोड्स असलेल्या मुस्लिम प्रेअर अ‍ॅप्सचाही समावेश आहे. गुगलनं ही दोन्ही अ‍ॅप्स बॅन केली आहेत. ती अ‍ॅप्स युझर्सचे फोन नंबर, नेटवर्क इन्फॉर्मेशन आणि IMEI चोरी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय गुगलने बारकोड स्कॅनर आणि क्लॉक अ‍ॅपवरही बंदी घातली आहे. रिपोर्ट्सनुसार, गुगलने प्ले स्टोअरवरच्या 12हून अधिक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ही सर्व अ‍ॅप्स युझर्सचा डेटा गोळा करत होती.

First published:

Tags: Apps, Google