गुगलची भन्नाट आयडिया, आता नोकरी शोधण्याचं टेन्शन संपलं!

गुगलची भन्नाट आयडिया, आता नोकरी शोधण्याचं टेन्शन संपलं!

गुगलने तरुणांना नोकरी शोधण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय आता इंटरनेट नसेल तरीही गुगल हवी ती माहिती देणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगलने आता भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. तरुणांना नोकरी शोधण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. गुगलने गुरुवारी गुगल फॉर इंडिया 2019 कार्यक्रमात याची घोषणा केली आहे. गुगलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुगल पेच्या माध्यमातून तरुणांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट अर्ज करता येणार आहे.

गुगल पे कडून तरुणांना नोकऱ्या शोधणं सोपं जाणार आहे. त्यांचे शिक्षण आणि अनुभव यानुसार नोकरीचे पर्याय उपलब्ध असतील. भारतात संध्या 6.7 कोटी युजर्स गुगल पे वापरतात. यात अब्जावधी रुपयांचा व्यवहार होतो. याचाही फायदा नव्या प्लॅटफॉर्मवर मिळेल. गुगल पे कडून 24सेव्हन, स्विगी, डुंजो यासारख्या हॉटेल सेवा पुरवणाऱ्या 25 पेक्षा जास्त कंपन्यांना एकत्र आणलं आहे. भविष्यात त्यांना जॉबसाठीच्या ऑफर या प्लॅटफॉर्मवर देता येणार आहेत.

गुगल पे अॅपवरून युजर्सना त्यांचा अनुभव, गरज याची माहिती देता येते. त्यांचे स्पॉट कार्डही तयार होते. त्याच्या मदतीने गुगल पे अॅप सुरू करताच युजर्सने दिलेली माहिती दिसेल. मेक माय ट्रिपनेदेखील यावर स्पॉट तयार केला आहे. आता इथूनही बूकिंग करता येईल.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उद्घाटनावेळी सांगितलं की, भारत सरकार एक खर्व डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचे लक्ष्य आहे. यामध्ये देय, सेवा, इंटरनेट ऑफ थिंग्स, ई-कॉमर्स, मशिन लर्निंग यांचा समावेश असेल.

गुगलवर फक्त हिंदी आणि इंग्लिशच नाही तर भारतीय भाषांमध्येही माहिती शोधता येईल. फोनमध्ये इंटरनेट नसेल तर एका विशेष टोल नंबरवर कॉल करून माहिती मिळवता येते. गुगलने गुरुवारी नवी फिचर्स आणि उत्पादने लाँच केली.

कोणतीही माहिती सर्च करताना इंग्लिश आणि हिंदीमध्ये येत होते. आता भारतीय भाषांमध्येही सर्च करता येईल. यामध्ये मराठी, तामिळ, बांगला, तेलुगु, कन्नड, मल्याळी, गुजराती, उर्दू आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.

वाचा : स्मार्ट व्हा! गाडीची कागदपत्रे जवळ नसतील तरी बिनधास्त रहा, यामुळे होणार नाही दंड

गुगलने टोल फ्री नंबर 0008009191000 लाँच केला आहे. याचा सर्वाधिक लाभ वोडाफोन आणि आयडीयाला होणार आहे. या नंबरवरून कोणत्याही युजरला गुगल असिस्टंटकडून हिंदी आणि इंग्रजीत माहिती मिळू शकते.

वाचा : iPhone 20 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या कोणत्या फोनची किंमत झाली कमी

कोणालाही पैसे पाठवण्यासाठी गुगल पे अॅपला डेबिट क्रेडिट कार्डला जोडता येईल. गुगल पे अॅप 6.7 कोटी युजर्स वापरतात. त्यांनी आतापर्यंत 11000 कोटी डॉलरचा व्यवहार केला आहे. तसेच पेमेंटसाठी टोकन कार्डची सेवाही सुरू करण्यात येणार आहे.

वाचा : दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या पूर्ण ऑफर!

SPECIAL REPORT: ...तरीही निवडून मीच येणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या