मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Doodle on COVID-19: कोरोनावरील उपाययोजनांबाबत जनजागृतीसाठी खास डुडल

Google Doodle on COVID-19: कोरोनावरील उपाययोजनांबाबत जनजागृतीसाठी खास डुडल

Google ने एक Doodle तयार केलं आहे. आपल्या डूडलच्या माध्यमातून गुगलनं लोकांना पुन्हा एकदा कोरोना महामारीविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

Google ने एक Doodle तयार केलं आहे. आपल्या डूडलच्या माध्यमातून गुगलनं लोकांना पुन्हा एकदा कोरोना महामारीविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

Google ने एक Doodle तयार केलं आहे. आपल्या डूडलच्या माध्यमातून गुगलनं लोकांना पुन्हा एकदा कोरोना महामारीविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. सध्या कोविड 19 (COVID-19) विषाणूचा संसर्ग काहीसा कमी झाला, तर दुसरीकडे नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं चित्र आहे. ही गोष्ट भविष्यासाठी घातक ठरू शकते. जर काळजी घेतली नाही, तर संसर्गाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढण्यास जास्त काळ लागणार नाही. याच गोष्टीकडे युजर्सच लक्ष वेधून घेण्यासाठी सर्च इंजिन Google ने एक Doodle तयार केलं आहे. आपल्या डूडलच्या माध्यमातून गुगलनं लोकांना पुन्हा एकदा कोरोना महामारीविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. गुगलनं आपल्या डूडलद्वारे Mask आणि Vaccination चं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

    यासह गुगलनं युजर्सना (Users) त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची माहिती देखील पुरवली आहे. कोरोना महामारीच्या संकटाला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरणं, स्वच्छता राखणं, दोन लोकांमध्ये किमान 2 फुटांचं अंतर राखण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आले आहेत. सुरुवातीला लोकांनी या उपाययोजना गांभीर्याने अंमलात आणल्या होत्या. मात्र, याबाबत लोक निष्काळजीपणा करत असल्याचं चित्र आहे.

    गच्चीवरही उभारता येणार 4G 5G Mobile Tower? Viral Message मध्ये किती तथ्य?

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) मे महिन्यात मास्कसंदर्भातील आकडेवारी सादर केली होती. देशातील जवळपास अर्धी लोकसंख्या मास्क वापरण्याबाबत गंभीर नसल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ज्यांनी मास्क वापरले आहेत त्यापैकी फक्त 14 टक्के लोकांनीच योग्य पद्धतीनं मास्क वापरलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 25 शहरांमध्ये केलेल्या अभ्यासानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

    ज्या लोकांनी मास्क लावलं होत त्यापैकी 64 टक्के लोकांनी आपल्या ओठांपर्यंतचं मास्क लावलेलं होतं. 20 टक्के लोकांनी फक्त दाढीपर्यंत मास्क लावल होतं, तर 2 टक्के लोकांनी मास्कचा वापर गळ्याची शोभा वाढवण्यासाठी केला होता. केवळ 14 टक्के लोकांनी योग्य पद्धतीनं मास्कचा वापर केला होता, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

    सर्वात लवकर हॅक होतात हे 10 Passwords, चुकूनही करू नका वापर

    भारतातील लसीकरण मोहीम

    भारतात 4 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम आता मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कोविन (CoWin) App वर झालेल्या नोंदींनुसार, आतापर्यंत देशामध्ये कोविड -19 लसीचे 98 कोटी ६० लाख डोस दिले गेले आहेत. यापैकी 69 कोटी 37 लाख 12 हजार 553 ही पहिल्या डोसची संख्या आहे. 27 कोटी 60 नागरिकांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे. कोविनमधील माहितीनुसार, देशात सध्या 42 हजार 994 केंद्रांवर लस दिली जात आहे. यातील 40 हजार 890 केंद्र सरकारी आहेत आणि 2 हजार 104 केंद्र खासगी आहेत.

    First published:

    Tags: Corona vaccination, Corona virus in india, Google