सावधान! बेडरूमपर्यंत पोहचलंय Google; तुमचं बोलणं कोणीतरी ऐकतंय

सावधान! बेडरूमपर्यंत पोहचलंय Google; तुमचं बोलणं कोणीतरी ऐकतंय

गुगल असिस्टंटचा वापर करून अनेक पुरुषांनी पॉर्न सर्च केलं तर पती-पत्नीमधील वादही यात रेकॉर्ड झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जुलै : गुगलसाठी काम करत असलेला थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर तुमचं बोलणं गूगल असिस्टंटच्या माध्यमातून ऐकत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. यामुळे अनेकांनी लोकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बेल्जियन ब्रॉडकॉस्टर VRT NWS ने म्हटलं आहे की गूगल होम स्पीकरच्या माध्यमातून लोकांची चर्चा रेकॉर्ड केली जात आहे. हे रेकॉर्डिंग गूगल स्पीच रिकग्नायझेशन चांगलं करण्यासाठी सब कॉन्ट्रॅक्टर्सना पाठवलं जात आहे.

VRT NWS ने जवळपास एक हजार एक्सपर्टना गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ऐकलं. त्यात स्पष्टपणे लोकांची माहिती आणि इतर खासगी गोष्टी ऐकू येत होती असं म्हटलं आहे. गुगल असिस्टंटचा वापर करून अनेक पुरुषांनी पॉर्न सर्च केलं. तर पती-पत्नीमधील वादही यात होता. मोठी चिंतेची गोष्ट अशी आहे की संपूर्ण जगातील लोकांनी गुगल असिस्टंटचा वापर केला त्यांचे रेकॉर्डिंग या सेव्ह होते.

इंटरनॅशनल डेटा कमिशननुसार, भारतात अमेजॉन एकोनं 2018 मध्ये 59 टक्के भागिदारीसह भारतीय बाजारात स्मार्ट स्पीकर आणले. त्यानंतर गूगल होमने 39 टक्के शेअर घेत यात उडी मारली.

2018 मध्ये एकूण 7 लाख 53 हजार युनिट पाठवण्यात आली. गूगल होमचे मिनी आणि इतर सर्व स्मार्ट स्पीकर मॉडेल विक्री झाले आणि ते बाजारपेठेत प्रमुख झाले. बेल्जियन ब्रॉडकॉस्टरने म्हटलं की, गूगल होम युजर्सनी 'Ok Google' वेक-अप वर्ड उच्चारला नसतानाही रेकॉर्डिंग केले जात होते.

गुगलने यावर उत्तर देताना म्हटलं की, व्हॉइस रिकग्निशन अचूक करण्यासाठी फक्त 0.2 टक्के रेकॉर्डिंग दिलं होतं. कॉन्ट्रॅक्टरनं डेटा सिक्युरीटी पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं कारण देत कंपनीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याआधी अमेझॉन अॅलेक्सा लोकांचे रेकॉर्डिंग ऐकत असल्याची चर्चा सुरू होती.

VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी

First published: July 12, 2019, 8:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading