नवी दिल्ली, 14 जून : जर तुम्ही Google Chrome युजर असाल, तर तुम्हाला आता अधिक सुरक्षित सुविधा मिळू शकते. आता गुगलकडून क्रोम ब्राउजरमध्ये मोठं अपडेट होणार आहे. यामुळे Chrome ब्राउजर युजर्ससाठी काहीही सर्च करणं आणि डाउनलोड करणं सुरक्षित होईल. यामुळे गुगलला फ्रॉडसारखी प्रकरणं रोखण्यास मदत मिळेल.
सेफ्टी फीचर -
गुगलकडून एक नवं सेफ्टी फीचर लाँच करण्यात येणार आहे. त्याशिवाय एक स्कॅनिंग टूलही लाँच केलं जाईल. यामुळे युजरला डाउनलोडिंग आधीच धोकादायक फाईल्सबाबत सूचना मिळेल. हे फीचर गेल्यावर्षी सुरक्षित ब्राउजिंगसाठी लाँच केलं गेलं होतं.
Chrome सिक्योरिटीचे वरुण खनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या फीचरमध्ये अॅडिशन प्रोटेक्शन दिलं जाईल. अशात ज्यावेळी क्रोम वेब स्टोरवरुन नवं एक्सटेंशन इन्स्टॉल केल्यानंतर, एक डायलॉग बॉक्स दिसेल, जो सांगेल तुम्ही इन्स्टॉल करत असलेलं एक्सटेंशन सुरक्षित आहे की नाही.
धोकादायक फाईल्स स्कॅन करता येणार -
नव्या सेफ्टी अपडेटनंतर क्रोमवर आलेल्या एखाद्या फाईलला, Google सेफ ब्राउजिंगसाठी अपलोड करेल. त्यानंतर रियल टाईममध्ये गुगल लिंकचा तपास करेल आणि फाईल असुरक्षित असल्यास, क्रोम एक नोटिफिकेशन जारी करेल. Google ने दिलेल्या माहितीनुसार, अॅडव्हान्स सेफ ब्राउजिंग युजर्सला इतर ब्राउजिंगच्या तुलनेत 35 टक्के अधिक सिक्योर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.