मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Chrome चं नवं फीचर, सुरक्षेच्यादृष्टीने युजर्सला होणार असा फायदा

Google Chrome चं नवं फीचर, सुरक्षेच्यादृष्टीने युजर्सला होणार असा फायदा

या फीचरद्वारे युजर्स आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये माहिती मिळवू शकतील, की कोणत्या वेबसाईटकडे त्यांच्याबाबतची कोणती माहिती पोहोचत आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 जुलै : गुगल क्रोम (Google Chrome) आपल्या ब्राउजरसाठी एक नवं प्रायव्हसी फीचर (Security Feature) रोल आउट करत आहे. या फीचरद्वारे युजर्स आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये माहिती मिळवू शकतील, की कोणत्या वेबसाईटकडे त्यांच्याबाबतची कोणती माहिती पोहोचत आहे.

Google ने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या साईटवर अपडेट केलेली माहिती सुरक्षा कंट्रोलसह, कोणत्या साईटला युजरची कोणती माहिती घेण्याची परवानगी आहे हे ट्रॅक करणं अधिक सुलभ होईल. वेबसाईटवर अपडेट केलेल्या माहितीचं पॅनल ओपन करण्यासाठी क्रोम अ‍ॅड्रेस बारच्या डावीकडे लॉक आयकॉनवर टॅप करा. तिथे दिसेल की, तुम्ही एखाद्या साईटला कोणती परमिशन दिली आहे.

क्रोम ब्राउजरचं हे अपडेट युजर्सला अ‍ॅड्रेस बारमध्ये टाईप केल्यानंतर माहिती देईल. जर युजरने Safety Check टाईप केलं, तर हे अपडेट पासवर्ड्सची सिक्योरिटी चेक करेल आणि मॅलिशियस एक्सटेंशन स्कॅन करण्याचं काम करेल.

दरम्यान, गुगलने यापूर्वीही आपल्या सर्चमध्ये युजर्सला आणखी एक सुविधा दिली आहे. युजर्स मोबाईलवर मागील 15 मिनिटांतील ब्राउजिंग हिस्ट्री त्वरित हटवू शकतात. तसंच गुगल आता साईट आयसोलेशन यावरही काम करत आहे. हे एक सुरक्षा सुविधा असून युजर्सला चुकीच्या, फेस वेबसाईटपासून वाचवू शकते.

(वाचा - UIDAI Alert! Aadhaar कार्डच्या या फ्रॉडपासून सावधान, अशी होतेय फसवणूक)

गुगलने नुकतीच त्यांची एक महत्त्वपूर्ण सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी गुगल बुकमार्क्स (Google Bookmarks) हे फीचर सर्व युजरसाठी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे.

First published:

Tags: Google, Tech news