पासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर

पासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर

तुमच्या अकाउंटमध्ये पासवर्ड टाकला गेला की तो गुगलच्या सर्व्हरला पाठवला जाईल आणि हॅकिंग झालं आहे की नाही हे तपासलं जाईल.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर: कुठलाही ब्राउझर वापरत असताना पासवर्डची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो, अशा स्थितीत काही ब्राउझर तुम्हाला सतर्क करतात, सुरक्षेचे विविध पर्याय देतात, एक उदाहरण म्हणजे तुम्ही नेहमीचा संगणक सोडून दुसऱ्या संगणकावर तुमचा ई-मेल सुरू केल्यास तातडीने तुमच्या फोनवर याबाबत अलर्ट येतो आणि तुम्हाला विचारणा होते, गूगल क्रोमचं हे फिचर आहे.

गुगल क्रोमने नुकतीच 86 बिल्ड रिलीजसह नवीन फिचर आणले आहे. गुगलच्या डेस्कटॉपवरील ब्राउझरमध्ये असलेलं पासवर्ड हॅक झाल्यावर अलर्ट देणारं फीचर आता कंपनीने मोबाइल ब्राउझरमध्येही उपलब्ध करून दिलं आहे. तुमचा पासवर्ड हॅक करून कोणी तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करायला प्रयत्न केला तर हा ब्राउझर तुम्हाला अलर्ट पाठवणार आहे. Mozilla Firefox, Apple Safari आणि Microsoft Edge हे ब्राऊझर ही सुविधा देतात, तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे का ते तुम्हाला सांगतात.

हे वाचा-आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत iPhone 11; कुठे आणि कधी मिळणार पाहा

तुमच्या अकाउंटमध्ये पासवर्ड टाकला गेला की तो गुगलच्या सर्व्हरला पाठवला जाईल आणि हॅकिंग झालं आहे की नाही हे तपासलं जाईल. जर कुणी हॅकिंग करतंय असं लक्षात आलं तर युझरला तसा अलर्ट जाईल. जेणेकरून अकाउंट हॅक होणार नाही आणि युझर तातडीने पासवर्ड बदलेल. जेव्हा तुमचा पासवर्ड बद्दलण्याची गरज असते तेव्हा ही प्रक्रिया वेळखाऊ ठरू शकते, मात्र अशा वेळी जेव्हा तुमच्या पासवर्ड सोबत कोणी छेडछाड केली असेल तर क्रोम तुम्हाला सतर्क करतेच मात्र थेट पासवर्ड बदलाच्या लिंकवर घेऊन जाते, यातून पासवर्ड बदलणे सहज शक्य होते. आणि तुमचा डेटा तुम्ही सुरक्षित ठेवू शकता.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर गुगल क्रोम ब्राउझरमध्ये तुमचा पासवर्ड सेव्ह केला असेल तरच तुम्हाला ही सुविधा वापरता येईल किंवा उपयोगी ठरेल. तुम्ही पासवर्ड सेव्ह केलाच नसेल तर ब्राउझर काहीच करू शकणार नाही.

हे वाचा-WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फिचर, आता एकाच फोनमध्ये असे वापरा दोन अकाउंट

याशिवाय इंटरनेट ब्राऊझिंगसातुमच्या अकाउंटमध्ये पासवर्ड टाकला गेला की तो गुगलच्या सर्व्हरला पाठवला जाईल आणि हॅकिंग झालं आहे की नाही हे तपासलं जाईल.ठी अनेक नवे सुरक्षित फिचर क्रोमने आणले आहेत. क्रोम iOS साठी टच टू फील पासवर्ड ही सुविधा उपलब्ध करून देत आहे, या माध्यमातून तुम्ही टच किंवा फेस आयडी याचा पासवर्ड बनवू शकतात जे तुमच्या स्पर्शानेच नंतर वापरता येणे शक्य होईल.

या व्यतिरिक्त, क्रोमचे पासवर्ड व्यवस्थापक आयओएसच्या वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये Chrome ऑटोफिल अक्टिव्ह केल्यास आयओएस अ‍ॅप्स किंवा ब्राउझरमध्ये सेव्ह केलेले पासवर्ड ऑटोफिल करता येतील.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 8, 2020, 9:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या