टोकियो,16 सप्टेंबर : प्रसिद्ध टेक फर्म गुगल (Google) लवकरच पुढील फ्लॅगशिप फोन Pixel 6 लाँच करणार आहे. पिक्सेल 6 ची छायाचित्रं आधीच समोर आली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, आता कंपनी गुगल ओरिजिनल चिप्सही विकत आहे? वास्तविक गुगलनं प्रथमच स्मार्टफोन चिपसेट सादर केला आहे. त्याचे नाव टेन्सर आहे आणि आता हाच चिपसेट पिक्सेल 6 या मोबाईल फोन सीरिजमध्ये दिसेल.
काय आहे चिप्स प्रकरण?
खरं तर चिप आणि चिप्समध्ये खूप फरक आहे. पण दोन्ही शब्द ऐकण्यात सारखेच वाटतात. याचा लाभ घेण्याची कंपनीची तयारी आहे. गुगलच्या पिक्सेल 6 मालिकेत एक नवीन चिपसेट येणार आहे आणि कंपनीला त्यांच्या नवीन चिपसेटचा प्रचार करायचा आहे. म्हणूनच पिक्सेल 6 अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी गुगल ही युक्ती अवलंबत आहे. जपानमध्ये कंपनीनं पिक्सेल 6 च्या प्रमोशनसाठी गुगल ओरिजिनल चिप्स सादर केली आहे. हे बटाटा चिप्स आहेत. यांच्याद्वारे कंपनीनं त्याच्या टेन्सर चिपसेटची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रचाराची सर्व तंत्रे
गुगलच्या ओरिजिनल चिप्सच्या पॅकेटला पिक्सेल 6 सीरीज सारखाच रंग ठेवण्यात आला आहे. मागील पॅनेल त्याच रंगाच्या डिझाइनमध्ये दिसेल. गुगलने पाच रंगांच्या पर्यायांसह चिप्सचे पॅकेट तयार केले आहे. कंपनीनं बटाटा चिप्सच्या 10 हजार पिशव्या बनवल्या आहेत. या भारतात उपलब्ध नाहीत. कारण, गुगल आपला नवीन पिक्सेल भारतात लाँच करणार नाही.
ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुगल अवलंबत आहे अशा युक्त्या
या चिप्सच्या पॅकेटच्या तळाशी गुगल सॉल्टी फ्लेवर लिहिलं आहे. गुगल पिक्सेल कमिंग सून असं सुद्धा खाली लिहिलेलं आहे. या ओळींतून कंपनी आपल्या फोनची जाहिरात करणार आहे. जपानमध्ये, गुगलनं लोकांना गुगलच्या चिप्सचं पॅकेट सानुकूल करण्याचा पर्याय देखील दिला आहे. म्हणजेच, लोक चिप्सच्या पॅकेटच्या बाजूला त्यांची नावे छापू शकतात.
हे वाचा - GPay वर केवळ 2 मिनिटांत काढा Online FD, पाहा सोपी प्रोसेस
गुगल अॅपलला स्पर्धा देईल का?
पिक्सेल 6 मालिकेत दिलेल्या टेंसर चिपसेटबद्दल बोलायचे झालं तर या वेळी गुगल या चिपसेटच्या माध्यमातून अॅपलशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. याचे कारण असे की, अॅपल आधीपासूनच त्यांच्या आयफोनमध्ये स्वतःचा चिपसेट पुरवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.