मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'या' कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर मिळतोय मोठा Discount

'या' कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर मिळतोय मोठा Discount

नव्या सीरिजमध्ये Mi QuickWake फिचर देण्यात आले आहे. यामुळे युजर आपला टीव्ही अत्यंत कमी वेळात सुरु करु शकतो.

नव्या सीरिजमध्ये Mi QuickWake फिचर देण्यात आले आहे. यामुळे युजर आपला टीव्ही अत्यंत कमी वेळात सुरु करु शकतो.

नव्या सीरिजमध्ये Mi QuickWake फिचर देण्यात आले आहे. यामुळे युजर आपला टीव्ही अत्यंत कमी वेळात सुरु करु शकतो.

नवी दिल्ली, 6 जून : सध्या स्मार्ट टिव्ही (Smart TV) आणि अॅन्ड्रॉईड टीव्हीचा (Android TV) जमाना आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे (OTT Platform) या प्रकारच्या टीव्हींना मोठी मागणी आहे. जी कंपनी या अनुषंगाने अधिक फिचर्स देते, त्या कंपनीचे टीव्ही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. ओटीटी प्लॅटफॉर्म, युट्युब सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे टीव्हीच्या माध्यमातून युजर्सला उपलब्ध होतात. त्यामुळे मनोरंजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. शाओमीने (Xiaomi) मागील वर्षी जे स्मार्ट टीव्ही लॉन्च केले होते. त्यात अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले होते. त्यातही 20Wचा स्पिकर आणि एमआय क्विक वेक फिचर (Mi Quickwake) हे अत्यंत महत्वाची वैशिष्ठे म्हणता येतील. विशेष म्हणजे सध्या सेलच्या माध्यमातून किफायतशीर दरात हे मॉडेल्स ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांची बचत होणार असून, अत्याधुनिक फिचर्स असलेला टीव्ही त्यांना खरेदी करता येणार आहे.

भारतात शाओमीने मागीलवर्षी आपल्या हॉरिझॉन एडिशन टीव्ही मालिकेतील दोन किफायतशीर स्मार्ट टीव्ही लॉन्च केले होते. यातील 32 इंचीचे मॉडेल ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. शाओमीने आपल्या प्लॅटफॉर्मवर डे सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 5 दिवसांचा असून त्याची अंतिम मुदत 8 जूनपर्यंत आहे. या सेलच्या माध्यमातून शाओमी प्रिमिअमपासून बजेट फोन्स स्वस्तात उपलब्ध करुन देत आहे. परंतु, या सेलमध्ये योग्य डील करुन स्मार्ट टीव्ही घरी आणण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.

आता मोबाईल नंबरशिवाय डाउनलोड करता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

Mi TV 4A Horizon सीरिज विषयी बोलायचं झालं तर ग्राहक या सेलमध्ये हा टिव्ही 19,999 रुपयांऐवजी 15,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. म्हणजेच या व्यवहारात ग्राहकांना या टीव्हीच्या खरेदीवर एकूण 4500 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. हा टीव्ही HD रेडी एलईडी स्मार्ट अॅण्ड्राईड टीव्ही आहे. या टीव्हीला 60Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीत ग्राहकांना पॅचवॉल युजर इंटरफेस मिळेल. Mi TV Horizon Edition मध्ये शाओमीच्या Vivid Picture Engine चा समावेश आहे.

या टीव्हीमध्ये असेल 20W चा स्टिरीओ स्पीकर

नव्या सीरिजमध्ये Mi QuickWake फिचर देण्यात आले आहे. यामुळे युजर आपला टीव्ही अत्यंत कमी वेळात सुरु करु शकतो. ऑडिओसाठी या सीरिजमध्ये 20W चा स्टिरीओ स्पीकर (Stereo Speaker) देण्यात आला आहे. हा स्पिकर DTS-HD ने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये 3.5 एमएम ऑडिओ आऊट, SPDIF आणि 3 HDMI पोर्टस देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Tv, Xiaomi