मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp Chat चा Look बदलणार, या मोबाईलमध्ये येणार Update!

WhatsApp Chat चा Look बदलणार, या मोबाईलमध्ये येणार Update!

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे फेसबुक (Facebook) कंपनीच्या मालकीचं असलेलं इस्टंट चॅट अॅप्लिकेशन (Instant Chat Application) संपर्कासाठी जगभरात वापरलं जाणारं अॅप आहे, यात काही शंकाच नाही.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे फेसबुक (Facebook) कंपनीच्या मालकीचं असलेलं इस्टंट चॅट अॅप्लिकेशन (Instant Chat Application) संपर्कासाठी जगभरात वापरलं जाणारं अॅप आहे, यात काही शंकाच नाही.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे फेसबुक (Facebook) कंपनीच्या मालकीचं असलेलं इस्टंट चॅट अॅप्लिकेशन (Instant Chat Application) संपर्कासाठी जगभरात वापरलं जाणारं अॅप आहे, यात काही शंकाच नाही.

    मुंबई, 5 ऑक्टोबर : व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे फेसबुक (Facebook) कंपनीच्या मालकीचं असलेलं इस्टंट चॅट अॅप्लिकेशन (Instant Chat Application) संपर्कासाठी जगभरात वापरलं जाणारं अॅप आहे, यात काही शंकाच नाही. व्हॉट्सअॅपकडून वेळोवेळी फीचर्स अपडेट (Features Update) केले जात असतात. अलीकडेच आलेल्या एका वृत्तानुसार व्हॉट्सअॅप आता आपल्या चॅट मेसेजच्या लूकमध्ये (New Chat Message Look) अपडेट आणणार आहे. WABetainfo या पोर्टलवर व्हॉट्सअॅपच्या अपडेट्सबद्दलची ताजी माहिती वेळोवेळी दिली जात असते. त्यावर दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचं एक नवं बीटा व्हर्जन (WhatsApp new Beta Version for iPhone users) युझर्सच्या टेस्टसाठी रिलीज करण्यात आलं आहे. या नव्या बीटा व्हर्जनमध्ये चॅट बबल्सना नवा लूक देण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपचा हा नवा अपडेट कसा आहे, हे पाहू या.

    WABetainfo या पोर्टलवर या वृत्तासोबतच अपडेटची तुलना करणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यात हा नवा लूक नेमका कसा असेल, हे दिसतं आहे.

    सोशल मीडिया थंड! Facebook, Whatsapp down

    व्हॉट्सअॅपचा चॅट बबल आता कोनांवर जास्त राउंडेड (More Rounded Corners) असेल. तसंच हा चॅट बबल आता पहिल्यापेक्षा जास्त मोठा असेल आणि त्याच्या बॅकग्राउंडला असलेला रंगही पूर्वीच्या तुलनेत अधिक गडद (Dark Colour) असेल, असं त्या वृत्तात म्हटलं आहे.

    याबद्दल अधिक माहिती अशी आहे, की हा अपडेट केवळ iPhone युझर्ससाठीच आला आहे. याचा अर्थ असा, की सध्या हा अपडेट केवळ अॅपलचे आयफोन (Apple iPhone) वापरणाऱ्यांनाच उपलब्ध होईल. अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना हा अपडेट कधी उपलब्ध होणार, याबद्दल कोणतीही माहिती या वृत्तात दिलेली नाही. त्यामुळे अँड्रॉइड युझर्सना (Android Users) या अपडेटसाठी काही काळ थांबावं लागणार एवढं निश्चित.

    या अपडेटव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप नव्या प्रायव्हसी फीचरवरही (New Privacy Feature) काम करत आहे. ते फीचर अॅक्टिव्हेट केल्यानंतर आपलं प्रोफाइल पिक्चर आणि लास्ट सीन या दोन्ही गोष्टी आपल्या काँटॅक्ट लिस्टमधल्या ठरावीक काँटॅक्ट्सकरिता हाइड करणं युझर्सना शक्य होणार आहे. हे फीचर iOS करिता टेस्ट केलं जात असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच WABetainfo पोर्टलने दिलं होतं. आता ताज्या वृत्तानुसार, हे फीचर अँड्रॉइडसाठीही टेस्ट केलं जात आहे. त्यामुळे लवकरच अँड्रॉइड युझर्सना हे नवं फीचर वापरायला मिळणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Apple, Iphone, Whatsapp