मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /अवघ्या 1 रुपयात घेता येईल Digital Gold! जाणून घ्या कशी कराल खरेदी

अवघ्या 1 रुपयात घेता येईल Digital Gold! जाणून घ्या कशी कराल खरेदी

भारतातील अधिकाधिक लोक डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. या पर्यायामध्ये व्यक्ती विविध प्लॅटफॉर्मद्वारे विक्रेते आणि रिफायनर्सकडून डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

भारतातील अधिकाधिक लोक डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. या पर्यायामध्ये व्यक्ती विविध प्लॅटफॉर्मद्वारे विक्रेते आणि रिफायनर्सकडून डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

भारतातील अधिकाधिक लोक डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. या पर्यायामध्ये व्यक्ती विविध प्लॅटफॉर्मद्वारे विक्रेते आणि रिफायनर्सकडून डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : भारतात दिवाळी (Diwali) आणि धनत्रयोदशीला (Dhanteras) सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या काळात सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. विशेषत: दागिने आणि नाण्यांच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला नागरिक जास्त पसंती देतात. मात्र, कोरोना महामारीच्या (corona pandemic) पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष दुकानात जाऊन दागिन्यांची खरेदी करणं धोक्याच मानलं जातं आहे. यावर डिजिटल सोन्याचा (digital gold) पर्याय समोर आला आहे. भारतातील अधिकाधिक लोक डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. या पर्यायामध्ये व्यक्ती विविध प्लॅटफॉर्मद्वारे विक्रेते आणि रिफायनर्सकडून डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

    सध्या भारतात Augmont Gold, MMTC-PAMP India Pvt. Ltd आणि Digital Gold India Pvt. Ltd या तीन कंपन्या डिजिटल गोल्ड उपलब्ध करून देतात. यापैकी MMTC-PAMP India Pvt. Ltd ही कंपनी म्हणजे सरकारी MMTC Ltd आणि Swiss firm MKS PAMP यांचं जॉइंट व्हेंचर आहे. Digital Gold India Pvt. Ltd सेफगोल्ड या ब्रँडने डिजिटल गोल्डची विक्री करते. याशिवाय पेटीएम, अमेझॉन पे, गुगल पे आणि फोनपे या लोकप्रिय वॉलेटद्वारेदेखील डिजिटल सोन्याची खरेदी करता येते.

    'डिजिटल सोने खरेदीमध्ये सोन्याच्या सर्व फायद्यांसह इतर देखील काही फायदे मिळत असल्यानं या पर्यायानं गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतल आहे. हे सोनं म्हणजे मोबाईल अॅपद्वारे डिजिटल पद्धतीनं केलेली सोनेखरेदीचं आहे,' अशी माहिती डिजिटल स्वीस गोल्ड अँड गिल्डेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशरफ रिझवी (Ashraf Rizvi) यांनी दिली.

    दिवाळीच्या काही दिवस आधी महागलं सोनं, वर्षाअखेर चांदी पोहोचणार 82,000 रुपयांवर?

    सहज उपलब्धता आणि कमी किंमत ही डिजिटल सोन्याच्या प्रचंड लोकप्रियतेमागची दोन महत्त्वाची कारणं आहेत. अशा या डिजिटल सोन्याची खरेदी करताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी नेमक्या कोणत्या जाणून घ्या.

    शुद्धता -

    सोनं खरेदीमध्ये शुद्धतेला सर्वांत जास्त महत्त्व आहे. कारण, त्यावरच सोन्याची किंमत ठरते. त्यामुळे डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वात अगोदर त्याची शुद्धता तपासली पाहिजे. MMTC-PAMP कडून खरेदी केलेलं डिजिटल सोनं सेफगोल्डशी संबधित प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेल्या सोन्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतं, असं मत फिनॉलॉजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल कामरा (Pranjal kamra) यांनी व्यक्त केलं आहे.

    अगदी एक रुपयांपासून सुरू होते किंमत -

    डिजिटल सोन्याची किंमत अगदी 1 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये सोनं खरेदी करून गुंतवणूक करणं शक्य होतं, अशी माहिती डिजिटल स्वीस गोल्ड अँड गिल्डेडचे संस्थापक अशरफ रिझवी यांनी दिली.

    साठवणूक -

    'तुम्ही विकत घेतलेलं सोनं केंद्रीकृत पद्धतीने साठवलं जातं आणि तुम्हाला डिजिटल व्हॉल्ट बॅलन्स स्वरूपात ते पाहता येतं. व्हॉल्टमधील सोनं ग्रॅम्सच्या रुपात दाखवलं जातं. तुम्हाला एकतर ते सोनं प्रत्यक्ष स्वरूपात रुपांतरित करून घेता येतं किंवा डिजिटल स्वरूपातच त्याची विक्री अप्लिकेशनच्या माध्यमातून व्हॉल्टमधूनच करता येते,' असं 5 पैसा कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रकाश गडानी यांनी सांगितलं.

    जीएसटी आणि इतर शुल्क -

    आपण दुकानात प्रत्यक्ष जाऊन सोनं खरेदी केली की त्यावर जीएसटीसह इतर शुल्क लागू होतात. अगदी त्याच प्रमाणं डिजिटल सोनं खरेदीमध्ये देखील सोन्याच्या किंमतीवर 3 टक्के जीएसटी लागू होतो. याशिवाय डिजिटल सोने विक्रेते ग्राहकांना स्टोरेज खर्च, विमा आणि ट्रस्टी फी म्हणून 2 ते 3 टक्के अतिरिक्त शुल्क आकारतात. जर ग्राहकाला डिजिटल सोन्याचं प्रत्यक्ष सोन्यात रुपांतर करायचं असेल, तर त्याच्या वजनानुसार मजुरी शुल्क (making charges) आकारलं जातं. हे सोनं जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर त्यासाठी अतिरिक्त शुल्कही भरावं लागू शकतं.

    मॅक्सिमम होल्डिंग कालावधी -

    डिजिटल सोन्याच्या उत्पादनांना जास्तीत जास्त होल्डिंग कालावधी असतो. तो संपल्यानंतर गुंतवणूकदाराला सोन्याची डिलिव्हरी घ्यावी लागते किंवा ते सोनं परत विकावं लागतं. वेगवेगळे व्यापारी डिजिटल सोन्यासाठी वेगवेगळा मॅक्सिमम होल्डिंग कालावधीची (maximum holding period) अट घालतात. तुम्ही तुमचं डिजिटल सोनं MMTC-PAMP कडे 5 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवू शकता. हा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला हे सोने विकाव लागेल किंवा त्याचं सोन्याच्या नाण्यांमध्ये रुपांतर करून घ्यावं लागेल. त्यामुळे डिजिटल सोन्याची खरेदी करण्यापूर्वी सर्व नियम आणि अटीचा बारकाईनं तपासल्या पाहिजेत. विशेषत: होल्डिंग कालावधी आणि गुंतवणूक मर्यादा तर तपासलीचं पाहिजे, असा सल्ला फिनॉलॉजीच्या प्रांजल कामरा यांनी दिला आहे.

    Success Story: चिकनध्ये जीव ओतून सुरू केली Licious कंपनी,आहे अब्जावधींचा व्यवसाय

    डिजिटल सोन्यावरील कर -

    डिजिटल सोन्याच्या होल्डिंग कालावधीवर त्यावर आकारला जाणारा कर अवलंबून असतो. कालावधीनुसार गुंतवणूकदाराला किती कर भरावा लागेल निश्चित केलं जातं. जर डिजिटल सोनं 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवलेलं असेल, तर त्याच्या परताव्यावर कर लागत नाही. डिजिटल सोन्यातून मिळालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 4 टक्के सेस (करावरील कर) आणि परताव्यावर 20 टक्के कर लावला जातो.

    तोटे -

    डिजिटल गोल्डच्या व्यवहारांवर भारतात कोणतीही नियामक यंत्रणा सध्याच्या घडीला नियंत्रण करत नाही. त्यामुळे हे व्यवहार थोडेसे असुरक्षित होतात. डिजिटल गोल्डसारखेच सर्व व्यवहार गोल्ड फंड्समध्येही करता येतात. गोल्ड फंड्सवर सेबीचं (SEBI) नियंत्रण असतं. त्यामुळे ही गुंतवणूक अधिक सुरक्षित होते. मोबाईल अॅप्स, म्युच्युअल फंड कंपन्याच्या वेबसाईट, गुंतवणूकीचे प्लॅटफॉर्म आणि मार्केटमध्ये गोल्ड फंडचे व्यवहार सहज करता येतात, असं पैसाबाजार डॉट कॉमचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन कुकरेजा यांनी सांगितलं.

    एकूणच डिजिटल सोनं खरेदीमध्ये अतिशय काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याची गरज आहे. सर्व काळजी घेऊन सोने खरेदी केल्यास हा नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Gold and silver, Gold bond, Gold price