Gmail सोबतच Youtube चाही सर्व्हर डाऊन, जगभरातील युजर्स हैराण

मागच्या महिन्यात देखील अशाच पद्धतीनं सर्व्हर डाऊन झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

मागच्या महिन्यात देखील अशाच पद्धतीनं सर्व्हर डाऊन झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

  • Share this:
    मुंबई, 20 ऑगस्ट : गुलगलकडून दिली जाणारी gmail ही सेवा सकाळी अनेक काळापासून विस्कळीत झाली आहे. गेल्या काही तासांपासून ही सेवा बंद असल्यानं युझर्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. भारतात gmailचा सर्व्हेर डाऊन झाल्याचं अनेक युझर्सनी ट्वीट करून सांगितलं. त्यानंतर गुगलने आपली यंत्रणा तपासून या बातमीला दुजोरा दिला आहे. गुगलचे gmail, गुगल ड्राईव्ह, युट्यूबचाही सर्व्हेर डाऊन झाल्याच्या अनेक तक्रारी लोकांनी केल्या आहेत. अचानक सर्व्हेर डाऊन झाल्यानं अनेक युझर्स हैराण झाले. काही युझर्सची gmail सेवा काही काळासाठी बंद असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. कंपनीकडून error काय हे शोधून तो काढण्याचं काम चालू आहे. लवकरच ही सेवा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं आहे. हे वाचा-नोकरी शोधण्यासाठी Google चे नवे अ‍ॅप; LinkedIn, Naukariला देणार टक्कर इंटरनेट-मॉनिटरींग डाउनडिटेक्टर वेबसाइटच्या म्हणण्यानुसार आज सकाळी 9 वाजता ही समस्या उद्भवली. असे सांगितले जात आहे की जास्तीत जास्त 62 टक्के समस्या फाइट अॅटॅच करताना आणि 27 टक्के समस्या लॉगइन करतान तर 10 टक्के समस्या मेल येत नसल्यानं झाल्या आहे. जीमेल किंवा ड्राईव्हवर फाईल अॅटॅच केल्यावर ती बाऊन्स होते किंवा एरर दाखवत असल्याची तक्रार अनेक युझर्सने केली. मागच्या महिन्यात देखील अशाच पद्धतीनं सर्व्हर डाऊन झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: