मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Gmail-Outlook युजर्स सावधान; हॅकर्सकडून या नव्या स्कॅमद्वारे अशी होतेय फसवणूक

Gmail-Outlook युजर्स सावधान; हॅकर्सकडून या नव्या स्कॅमद्वारे अशी होतेय फसवणूक

Gmail आणि Outlook युजर्सला या फेक मेलद्वारे टार्गेट केलं जातं. Mail मध्ये युजरला गिफ्ट दिलं जाण्याचं सांगितलं जातं. मेलमधील गिफ्ट्स कार्ड्सद्वारे स्टोर्समध्ये खरेदी करता येईल असं आमिष दिलं जातं.

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : देशात कोरोना काळात ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राइमच्या प्रकरणांत मोठी वाढ झाली. हॅकर्सकडून विविध प्रकारे युजर्सची फसवणूक केली जाते. WhatsApp, Gmail वर मालवेअर लिंक पाठवून युजर्सकडून त्यावर क्लिक केलं जातं आणि त्यानंतर युजर्सची पर्सनल माहिती, डेटा चोरी केला जातो. आता Gmail वर आणखी एक स्कॅम, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

नव्या स्कॅममध्ये Gmail आणि Outlook युजर्सला टार्गेट केलं जात आहे. हा मेल सुपरमार्केटकडून आल्याचं सांगितलं जातं. या मेलवर युजर्सला क्लिक करण्यास भाग पाडलं जातं. लिंकवर एकदा क्लिक केल्यानंतर युजर्स आपले पैसे, प्रायव्हेट डेटा गमावतात.

Gmail आणि Outlook युजर्सला या फेक मेलद्वारे टार्गेट केलं जातं. Mail मध्ये युजरला गिफ्ट दिलं जाण्याचं सांगितलं जातं. मेलमधील गिफ्ट्स कार्ड्सद्वारे स्टोर्समध्ये खरेदी करता येईल असं आमिष दिलं जातं. हे गिफ्ट कार्ड्स क्लेम करण्यासाठी युजरला एका लहानशा सर्व्हेमध्ये भाग घेण्याबाबत सांगितलं जातं. युजरने या लिंकवर क्लिक केल्यास, त्यांना एका वेबसाइटवर रिडायरेक्ट केलं जातं. सर्व्हेमध्ये भाग घेतल्यानंतर युजर्सला कोणतेही गिफ्ट कार्ड्स मिळत नाहीत. पण युजर्सचा पर्सनल डेटा मात्र चोरी केला जातो.

WhatsAppवर Amul चा 6000रुपये जिंकण्याचा मेसेज आला?सावध व्हा,रिकामं होईल बँक खातं

याआधीही अनेक प्रकारचे फ्रॉड करण्यात आले आहेत. हॅकर्स, फ्रॉडस्टर्स युजर्सची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे WhatsApp, Mail वर किंवा इतर सोशल मीडिया साइट्सवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणीही ऑफर मिळण्याबाबत, एखाद्या मोठ्या कंपनीच्या नावाने गिफ्ट्स मिळत असल्याचं सांगत मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नका.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Gmail, Online fraud