• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Facebook, Insta, WhatsApp नंतर आता Gmail Down; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Facebook, Insta, WhatsApp नंतर आता Gmail Down; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

जी-मेल (Gmail down) युझर्सना बऱ्याच समस्या येत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 12 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वीच काही सोशल मीडिया (Social media) तात्पुरते बंद झाले होते. यामध्ये फेसबुक, इन्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा समावेश होता. यानंतर आता गुगलची (Google) जी-मेल सेवाही (Gmail Down) डाऊन झालं आहे (Gmail outage). जी-मेल युझर्सना कोणतेही मेल येत नाही आहेत किंवा पाठवताही येत नाही आहेत. जी-मेल बाबत ट्विटरवर तक्रारींचा पाऊस आहे. जी-मेल ही गुगलची मोफत ई-मेल सेवा आहे.  भारतात जी-मेल बंद झालं आहे.  युझर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.   डाऊनडिटेक्टरच्या मते, 68 टक्के जी-मेल युझर्सना वेबसाईटवर समस्यांचा सामना करत आहेत. 18  टक्के  युझर्सना सर्व्हर कनेक्शन तर  14 टक्के युझर्सनी लॉगिनमध्ये अडचण येत आहे. ट्विटरवर याबाबत बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या आहे.  #GmailDown आणि जीमेलसंबंधित हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. दरम्यान गुगलकडून याबाबत अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही. 14 डिसेंबर 2020 रोजीही जी-मेल डाऊन झाला होता. हे वाचा -  Gmail-Outlook युजर्स सावधान; हॅकर्सकडून या नव्या स्कॅमद्वारे अशी होतेय फसवणूक दरम्यान 4 ऑक्टोबरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, WhatsApp आणि Instagram सोमवारी रोजी जवळपास 6 तास ठप्प झालं होतं. यापैकी कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर मेसेज जात नव्हते. 6 तासानंतर पहाटे 3 च्या सुमारास Facebook, WhatsApp आणि Instagram पुन्हा रिस्टोर झालं. गुगलची सेवा ठप्प झाली तर काय होईल? जी-मेल ही गुगलची सेवा आहे. भारतासह अनेक देशांत प्रमुख सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर होतो. गुगल ठप्प झालं तर काय होईल. तार्किकदृष्ट्या ही बाब शक्य नाही तरी पण जर ही सेवा काही काळ जरी खंडीत झाली तर त्याचा आपल्या जीवनावर निश्चितच परिणाम होऊ शकतो. हे वाचा - Facebook चा नवा लुक; आता Page वर दिसणार नाही Like बटण जाणकारांच्या म्हणण्यानुसार सर्चवर परिणाम होईल. ट्रॅफिक, न्यूज तसेच सूचना मिळण्यात अडचणी निर्माण होतील. सोशल मिडीया आणि वृत्त कार्यालये गुगल म्हणून सारखे ओरडत बसतील. या प्रकारामुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या अर्थव्यवस्थांना झटका बसू शकतो. आपलं आयुष्य 25 वर्षे मागे जाईल. मीडीया आणि सोशल मीडिया तर दूरच पण मोबाईल आणि कॅाम्प्युटरवर आधारित प्रक्रियांवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो.
  Published by:Priya Lad
  First published: