जगभरात Gmail, YouTube डाउन; ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

जगभरात Gmail, YouTube डाउन; ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब आणि जीमेल अचानक डाउन झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : प्रसिद्ध व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (Youtube)  आणि जीमेल अचानक डाउन झालं आहे. संपूर्ण जगभरातील युजर्स यूट्यूब आणि जीमेलचा वापर करू शकत नाहीत.

जीमेल डाउन झाल्याची तक्रार होताच, जीमेल, यूट्यूबने ट्विटरवर काही युजर्सला जीमेल अकाउंटमध्ये नेमकं काय झालं आहे, याबाबत माहिती देण्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी याबाबत मदत करत असल्याचंही म्हटलं आहे.

जीमेलसह गुगलच्या अनेक ऍप्सचा सर्व्हर डाउन झाला आहे. गुगल ऍप्स, यूट्यूब अचानक डाउन झाल्याने अनेकांना समस्या येत असून युजर्स आपलं जीमेल अकाउंट ऍक्सिस करू शकत नाहीयेत.

गुगल ऍप्स डाउन होताच, ट्विटरवर जीमेल ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटर युजर्स #YouTubeDOWN, #googledown हॅशटॅग वापरून अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: December 14, 2020, 5:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या