क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्या 'या' कार, तुम्हीही असुरक्षित प्रवास करताय का?

क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्या 'या' कार, तुम्हीही असुरक्षित प्रवास करताय का?

देशात कोणत्या कार सुरक्षित आहेत आणि क्रॅश टेस्टमध्ये त्यांना किती रेटिंग मिळालं याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : वाहनांची निर्मिती करताना अपघात झाल्यास ते वाहनाच्या सुरक्षिततेसाठी काही नियम घालून दिले जातात. देशात कोणत्या कार सुरक्षित आहेत आणि क्रॅश टेस्टमध्ये कोणत्या कारला किती गुण मिळाले याची माहिती समोर आली आहे. ग्लोबल एनसीएपीने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ग्लोबल एनसीएपीने #SaferCarsForIndia या मोहिमेंतर्गत क्रॅश टेस्ट घेतली होती. यामध्ये मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R), अर्टिगा (Ertiga), ह्यूंदाई सँट्रो (Hyundai Santro) आणि डॅटसन रेडीगो (Datsun Redigo) या कारचा समावेश होता. ऑटोकार इंडियाच्या वृत्तानुसार, एकही कार क्रॅश टेस्ट पास करू शकली नाही. कोणत्याही कारला टाटा नेक्सॉनसारखे रेटिंग मिळाले नाही. या कारला क्रॅश टेस्टिंगमध्ये पाच स्टार आहेत.

भारतात एबीएस, सीट बेल्ट रिमाइंडर्स, स्पीड अलार्म आणि ड्रायव्हर साइड एअरबॅग यासारकी सेफ्टी फीचर्स बंधनकारक केली आहेत. सुऱक्षेची एवढी खबरदारी घेतल्यानंतरही गाड्या क्रॅश टेस्टमध्ये पास होऊ शकल्या नाहीत.

क्रॅश टेस्टमध्ये अर्टिगाला तीन स्टार रेटिंग मिळाले. या कारच्या अडल्ट प्रोटेक्शनमध्ये तीन स्टार मिळाले. तर एमपीव्हीच्या बॉडीशेल, फुटवेल यात अनस्टेबल रेट मिळाला. तर हेड आणि नेक प्रोटेक्शनच्या बाबतीत कार चांगली असल्याचं म्हटलं आहे.

मारुतीची लोकप्रिय हॅच बॅक वॅगनआरला अडल्ट प्रोटेक्शनमध्ये दोन स्टार तर बॉडीशेल आणि फुटवेलमध्ये अनस्टेबल रेट मिळाला. हेड आणि नेक प्रोटेक्शनच्या बाबतीत बऱ्यापैकी असून चेस्ट प्रोटेक्शनमध्ये त्रुटी आढळल्या. ह्युंदाईच्या सेंट्रोलादेखील दोन स्टार मिळाले आहेत. या कारमध्ये ड्रायव्हरच्या चेस्ट प्रोटेक्शनमध्ये कमी रेट देण्यात आले.

वाचा : तोच रंग, तीच स्टाईल आणि नवा अंदाज, लिमिटेड JAWA जिंकण्याची 'ही' आहे संधी!

क्रॅश टेस्ट केलेल्या कारमध्ये डॅटसन रेडिगोला सर्वात कमी रेटिंग मिळाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये अनेक अडचणी आहेत. क्रॅश टेस्टमध्ये फक्त एकच स्टार मिळाला. तसेच ड्रायव्हरच्या चेस्ट प्रोटेक्शनमध्ये सर्वात खराब रेटिंग देण्यात आलं आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या