Home /News /technology /

जबरदस्त..! 200 फूट खोल दरीत कोसळूनही प्रवासी सुरक्षित, भारत निर्मित मजबूत कारची कमाल

जबरदस्त..! 200 फूट खोल दरीत कोसळूनही प्रवासी सुरक्षित, भारत निर्मित मजबूत कारची कमाल

भारतात मजबूत आणि सर्वात सुरक्षित कार्समध्ये Tata च्या कार्स आपल्या सेफ्टीसाठी पॉप्युलर आहेत. एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने पुन्हा एका टाटाच्या कार्स भारतीय निर्मित वाहनांमध्ये सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक असल्याचं सिद्ध झालं आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 26 जानेवारी : भारतात मजबूत आणि सर्वात सुरक्षित कार्समध्ये Tata च्या कार्स आपल्या सेफ्टीसाठी पॉप्युलर आहेत. टाटा हॅरियर (Tata Harrier) आणि टाटा पंच (Tata Punch) या कार्सपैकी एक आहे. या कार्स ग्लोबल एनसीएपीकडून (Global NCAP) चांगले रेटिंग मिळाले आहेत. अशातच एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने पुन्हा एका टाटाच्या कार्स भारतीय निर्मित वाहनांमध्ये सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक असल्याचं सिद्ध झालं आहे. ही घटना हिमाचल प्रदेशातील आहे. टाटा नेक्सॉन (Tata Nexon) कारला बर्फवृष्टीमुळे अपघात झाला. कार तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळताना कार अनेकदा पलटी झाली आणि झाड्यांमध्ये जावून अडकली. हा अपघात इतका भयंकर होता, की यात बसलेल्या प्रवशांचं वाचणं जवळपास अशक्य होतं.

  हे वाचा - Traffic Rule:...तर 23000 रुपये भरावा लागेल दंड,बाइक चालवताना हे नियम लक्षात ठेवा

  200 फूट दरीत कोसळली कार - निखिल राणा नावाच्या एका यूट्यूबरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. अपघाताची माहिती एका स्थानिक व्यक्तीने निखिल राणाला दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमध्ये दोन प्रवाशी होते. हैराण करणारी बाब म्हणजे या भयंकर अपघातानंतरही प्रवासी सुरक्षितरित्या बाहेर आले. दोन्ही प्रवाशांना जखमदेखील झाली नाही. ते स्वत:चं कारमधून बाहेर आले. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कारलाही मोठं नुकसान झालं नसल्याचं दिसतंय.

  हे वाचा - VIDEO: रिक्षा आहे की लक्झरी कार,ऑटोच्या भन्नाट मोडिफिकेशने Anand Mahindraही चकित

  Global NCAP मध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग - Tata Nexon, Global NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग मिळवणारी देशातील पहिली कार ठरली. या कारने 17 पैकी एकूण 16.07 रेटिंग मिळवलं आणि स्वत:ला भारतात बनवलेली सर्वात सुरक्षित कार सिद्ध केलं. ABS फुल चॅनल वर्जन, ड्यूल स्टँडर्ड एयरबॅग आणि सीट बेल्ट रिमाइंडर अशा गोष्टींमुळे 5 स्टार रेटिंगपर्यंत पोहोचण्यात आलं. Nexon SUV - टाटा मोटर्सने जानेवारी 2020 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Nexon SUV लाँच केली होती. इलेक्ट्रिक एसयूवी सिंगल चार्जमध्ये 312 किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याशिवाय ही कार केवळ 60 मिनिटांत 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. फुल चार्ज होण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. या SUV मध्ये टाटा मोटर्सने डबल एयरबॅग (Airbags), एबीएस विथ ईबीडी (ABS with EBD), कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल (Corner Stability Control) आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची किंमत 13 लाख 99 हजार रुपये आणि टॉप वेरिएंटची किंमत 16 लाख 25 हजार रुपये आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Tata group

  पुढील बातम्या