एक मिस कॉल द्या आणि पीएफची रक्कम जाणून घ्या!

एक मिस कॉल द्या आणि पीएफची रक्कम जाणून घ्या!

एका क्रमांकावर तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाईलवरुन मिस कॉल दिलात तरी तुम्हाला तुमचा बॅलन्स समजू शकणार आहे.

  • Share this:

23 मार्च : पीएफ म्हणजे नोकरी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची पूंजी असते. आता आपल्या याच पीएफ अकाऊंटमध्ये किती रक्कम जमा झालेली आहे याची माहिती सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी सरकारने मिस्ड कॉल सुविधा सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही एका क्रमांकावर तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाईलवरुन मिस कॉल दिलात तरी तुम्हाला तुमचा बॅलन्स समजू शकणार आहे.

011-22901406 या नंबरवर तुमच्या पीएफ क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईलवरुन मिस कॉल द्या. मिस कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाईलवर बॅलन्स सांगणारा एक मेसेज येईल. याव्यतिरिक्त ईपीएफओ एसएमएस सेवेच्या माध्यमातून देखील तुम्हाला पीएफ अकाउंटमध्ये असलेल्या रकमेविषयी माहिती मिळेल.

यासाठी तुम्हाला 07738299899  या नंबरवर एसएमएस करावा लागेल. परंतु, ज्यांनी यूएएन अॅक्टिव्हेट केलंय त्यांनाच ही सुविधा उपलब्ध होईल. एसएमएस पाठवताना मेसेज बॉक्स मध्ये EPFOHO UAN टाईप करा. त्यानंतर ज्या भाषेत माहिती हवी असेल त्या भाषेची पहिली तीन अक्षरे लिहा.

उदारणार्थ :

EPFOHO UAN ENG असे लिहून पाठवल्यास तुम्हाला तुमचा बॅलन्स समजू शकेल. विशेष म्हणजे या सुविधेसाठी तुमच्याकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन असण्याची आवश्यकता नाही.

मुख्य म्हणजे आधी प्रत्येक नोकरीसाठी वेगळे पीएफ अकाऊंट सुरु करावे लागायचे. मात्र आता तुम्ही आयुष्यभर कितीही नोकऱ्या बदलल्या तरीही तुम्हाला एकाच पीएफ अकाऊंटमध्ये ती रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम किती आहे ते समजून घेणे सोपे होणार आहे.

 

First published: March 23, 2018, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading