धक्कादायक! इन्स्टाग्रामसह इतर अॅपवरून सुरू होती मुलींची विक्री

धक्कादायक! इन्स्टाग्रामसह इतर अॅपवरून सुरू होती मुलींची विक्री

गुगल आणि अॅपल स्टोअरवर असेलल्या अॅपवरून मुलींची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अॅप डेव्हलपर्सना त्या जाहिराती हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : फेसबुकच्या मालकीचं असलेल्या इन्स्टाग्रामसह आता गूगल आणि अॅपल स्टोअरवर अशा अनेक अॅप्सची माहिती समोर आली आहे ज्यावरून मुलींची विक्री होत आहे. बीबीसी न्यूज अरबीनुसार या अॅपमध्ये महिलांना कामगार म्हणून समोर आणलं गेलं होतं. अॅपमध्ये कमी वयाच्या मुलींसोबत महिलांसाठी कामवाली किंवा विक्रीसाठी कामवाली अशा प्रकारचे शब्द वापरले जात होते. त्यासाठी विशिष्ठ हॅशटॅग असायचे.

महिलांच्या विक्री अॅफवरून होत असल्याचं समोर आल्यानंतर कुवेत प्रशासनाने त्वरीत संबंधित जाहिराती हटवण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय अॅप तयार करणाऱ्या कंपनीकडून कायदेशीर आश्वासन घेण्यात आलं आहे की अशा प्रकारच्या कृत्यामध्ये पुन्हा कधीच भागीदार होणार आहे.

प्रकरणाचे गांभीर्य पाहून फेसबुकने स्पष्ट केलं आहे की यावर कारवाई केली जात आहे. सोसळ मीडियावर टाकण्यात आलेल्या अशा प्रकारच्या पोस्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून हटवल्या आहेत. यासह अशा प्रकारच्या जाहिराती पुन्हा टाकल्या जाऊ नये यासाठी संबंधित लोकांना ब्लॉक केलं आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर एका महिलेची शोध घेतला जात आहे. ती महिला संपूर्ण नेटवर्क वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून चालवत होती.

वाचा : तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप पर्यंत कसे पोहोचतात हॅकर्स? एका SMS ने साधला जातो डाव

अॅपवरून महिला एका मुलीची विक्री करत होती. हे समजल्यानंतर महिलेचा शोध सुरु करण्यात आला आहे. अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय वकील किम्बरली मॉटली यांनी सांगितलं की, अॅप डेव्हलपर्स यांच्यासह गूगल आणि अॅपलने याची भरपाई केली पाहिजे.

जिओच्या स्वस्त ऑफर विसरून जाल, कॉल केल्यावर पैसे देणार 'ही' कंपनी

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2019 10:59 AM IST

ताज्या बातम्या