Elec-widget

कमालच म्हणायची! वर्षभर स्मार्टफोनविनाच जगली, आता मिळणार 71 लाख रुपये

कमालच म्हणायची! वर्षभर स्मार्टफोनविनाच जगली, आता मिळणार 71 लाख रुपये

स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 07 ऑक्टोबर : सध्याच्या काळात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण घटक झाला आहे. त्यामुळं फेसबूक, व्हॉट्सअॅप, टीक-टॉकसारखे सोशल मीडिया अॅपची सवय आपल्याला लागली आहे. या अॅपपासून लांब राहणे कोणलाही शक्य नाही आहे. पण जर तुम्हाला कळलं की एक वर्ष स्मार्टफोन शिवाय राहा आणि 71 लाख कमवा तर?

हो, असे झाले आहे. न्यूयॉर्कच्या एका तरूणीनं असं करून दाखवले आहे. इलाना मगडॅन नावाच्या महिलेनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे चॅलेंज घेतले होते. त्यानंतर तिनं वर्षभर कोणत्याही स्मार्टफोनचा वापर केलेला नाही. न्यूयॉर्कची कंपनी Vitaminwaterने या चॅलेंजचे आयोजन केले होते. याचे नाव होते, 'Scroll Free for a Year'. जवळजवळ एक लाख लोकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

मात्र यातून 29 वर्षांची इलानाची या स्पर्धेची विजेती म्हणून निवड झाली आहे. चॅलेंजनुसार एक वर्ष स्मार्टफोनचा वापर करायचा नव्हता. असे केल्यास बक्षिस म्हणून 1 लाख डॉलर (71 लाख) दिली जाणार होती.

Loading...

या चॅलेंजनुसार इलानाचा iPhone 5s घेऊन तिला एक फ्लिप स्मार्टफोन दिला होता. या स्मार्टफोनवरून फक्त कॉलिंग आणि मेसेज पाठवू शकत होती. या चॅलेंजला डिसेंबरमध्ये आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानंतर इलानाला 71 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. दरम्यान तिला बक्षिस देण्यासाठी कंपनी लाय-डिटेक्टर टेस्ट घेणार आहे. ही टेस्ट फेब्रुवारी 2020मध्ये केली जाणार आहे. त्यानंतर बक्षिसाची रक्कम तिला मिळणार आहे.

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...