Home /News /technology /

Online Fraud मध्ये वापरलेल्या 132 फोन नंबर्सची यादी पोलिसांकडून जारी, अशी होत होती फसवणूक

Online Fraud मध्ये वापरलेल्या 132 फोन नंबर्सची यादी पोलिसांकडून जारी, अशी होत होती फसवणूक

शून्य टक्के व्याजाने कर्ज देणं आणि पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यावर त्याचं पेमेंट लवकर करण्याच्या नावाखाली लोकांना कॉल करुन त्यांची फसवणूक करण्याऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

    गाझियाबाद, 28 जुलै : कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन ट्रान्झेक्शनमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. फ्रॉड करणारे विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. विविध नंबर्सवरुन कॉल करुन ऑफर्स, सेलच्या जाळ्यात अडकवून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांत शून्य टक्के व्याज दराने कर्ज देणं किंवा पॉलिसी मॅच्युरिटीच्या नावाने मोबाईलवरुन कॉल करुन ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणं समोर आली आहेत. फसवणुकीची वाढती प्रकरणं, सायबर क्राईमचा वाढता धोका पाहता गाझियाबाद पोलिसांनी तब्बल 132 मोबाईल नंबर जारी केले आहेत. या मोबाईल नंबरद्वारे लोकांची मोठी फसवणूक झाली आहे. कोणाचीही ऑनलाईन, आर्थिक फसवणूक झाली असल्यास, पोलिसांशी संपर्क करण्याचंही सांगण्यात आलं आहे. मागील आठवड्यात गाझियाबाद पोलीस आणि सायबर सेलने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. शून्य टक्के व्याजाने कर्ज देणं आणि पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यावर त्याचं पेमेंट लवकर करण्याच्या नावाखाली लोकांना कॉल करुन त्यांची फसवणूक करण्याऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काही लोक अशा बनावट, फेक ऑफरच्या जाळ्यात अडकतात आणि फसवणुकीचे बळी ठरतात. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींनी आतापर्यंत 10 हजार लोकांकडून 50000000 रुपयांहून अधिक रक्कम उकळली आहे. या टोळीनेही अनेकांची फसवणूक केली असल्याचं कबूल केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी 14 तरुणींसह 30 लोकांना अटक केलं आहे. पोलिसांनी लोकांच्या मदतीसाठी 132 मोबाईल नंबर जारी केले आहेत. या टोळीने विविध भागातील लोकांची फसवणूक केली असून या इतक्या नंबर्सचा ऑनलाईन फ्रॉडसाठी वापर केला गेला आहे. Alert! Fraud करण्यासाठी सायबर क्रिमिनल्सकडून केला जातो या ट्रिकचा वापर 8929880300 8929977784 7669911966 9999839324 8750712241 9643303035 8585999717 8447289977 9718169815 9718011215 9654589244 9873993956 9891870412 8377900015 9718011241 7579976494 8447344331 7535928706 9873351671 9999874853 8929618246 8929618256 9643333178 8929618254 9873959880 9999821351 7467078052 9667495178 8929618257 9667240231 8447375005 8373986958 7354217141 8750334335 9758669279 8929782004 8929618297 7292009817 8929977785 9873173805 9355368671 8750662981 9643666560 9654371351 8586869911 8929618258 8826041868 8929618320 8377900013 9540709388 8929618242 8929618244 9643333023 6391389781 8750750601 9873163357 7500040155 8447288874 8929618260 7253835402 8506854272 8447000165 9718395765 9718020369 9675487278 9477121880 8447615550 9758665042 9432245974 9007656536 8447002614 8586095410 9105076602 9718084124 7379183461 9891517833 7409249268 8447664200 8743951289 8929161912 8294720010 8750738984 9711373163 8860686377 8447986639 7044309253 8112949290 9689305499 9689305418 9689305630 9311514984 9689305977 9689405408 9689405558 9689405758 9689405955 9689505596 9689505764 9689805139 9689805376 9689805440 9689805818 9711483027 9689205260 9689305349 9689505950 9689805779 9689405712 9689605089 9689605110 9689605123 9689605147 9689605149 9689605152 9689605228 9689605247 9689605248 9689605333 9689805466 9717263347 9990433412 8929369404 9689605109 4040716539 8929771147 9007656562 9667951797 9689505808 8929818223 9560395543 9689805703 9711319417
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

    पुढील बातम्या