Home /News /technology /

Flipkart Sale: 48MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स असलेला हा स्मार्टफोन 10 हजारात खरेदी करण्याची संधी

Flipkart Sale: 48MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स असलेला हा स्मार्टफोन 10 हजारात खरेदी करण्याची संधी

जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये पोको एम 3 (POCO M3) हा जबरदस्त स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

  नवी दिल्ली, 12 जुलै: फ्लिपकार्टचा (Flipkart) इलेक्ट्रॉनिक सेल (Flipkart Electronic Sale) सुरू आहे. आज 12 जुलै सेलचा तिसरा दिवस आहे. जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये पोको एम 3 (POCO M3) हा जबरदस्त स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये खरेदी करता येऊ शकतो. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट मिळतो आहे. परंतु सर्वात पॉप्युलर डील POCO M3 वर असून ऑफरमध्ये हा फोन स्वस्तात खरेदी करता येईल. POCO M3 ची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. परंतु या सेलमध्ये हा फोन दोन हजार रुपयांनी स्वस्त मिळतो आहे. फोनच्या बेस वेरिएंटची किंमत 10,999 आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन मोबाईल खरेदी केल्यास, 10 टक्के सूट आहे. त्यामुळे हा फोन 10,249 रुपयांत खरेदी करता येईल. तसंच अ‍ॅक्सिस बँकेच्या डेबिट कार्डने फोन खरेदी केल्यास 500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. POCO M3 फोन दोन वेरिएंट 6GB रॅम आणि 64GB, 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. बेस वेरिएंट 10,999 रुपये आहे, तर टॉप वेरिएंट 11,999 रुपये आहे. सेलमध्ये हा फोन मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.

  (वाचा - काउंटरवर खरेदी केलेलं तिकीट ऑनलाईन कसं कराल कॅन्सल, असं मिळेल रिफंड)

  POCO M3 स्पेसिफिकेशन्स - - 6.53 IPS LCD डिस्प्ले - गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन - Qualcomm Snapdragon 662 चिपसेट - अँड्रॉईड 11 बेस्ट - 6000 mAh बॅटरी - 18 W फास्ट चार्जिंग ट्रिपल कॅमेरा सेटअप - फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. तर इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल देण्यात आले आहेत. फोनला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Flipkart, Smartphone, Tech news

  पुढील बातम्या